ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी(१८ नोव्हेंबर) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सत्तरच्या दशकात दूरदर्शनवर गोड हसरा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजातील निवेदनाने ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ त्यांनी गाजवला होता. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्याचबरोबरीने त्यांच्या जवळच्या कलाकरांना हा धक्का बसला आहे.

विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर तबस्सुमच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या खूप जवळ होता. आजतक डॉट इन बोलताना त्याने सांगितले, “मला त्यांच्या निधनाची बातमी मुलीकडून कळली मला वाटले अफवा आहे. मात्र हे बातमी खरी आहे हे कळताच मला सुचत नाहीये मी काय प्रतिक्रिया देऊ? तो पुढे म्हणाला मी त्यांना मोठ्या बहिणीप्रमाणे मानतो. आम्ही एकत्र कार्यक्रम केले आहेत. त्या कल्याणजी आनंदजी यांच्या कार्यक्रमात निवेदनाच काम असायच्या तर मी मिमिक्री करायचो. मला जेव्हा काम नव्हते तेव्हा त्यांनी मला मदत केली. त्या मला घरी जेवणासाठी बोलावत, तसेच माझ्या करियरमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसाठी त्यांनी माझे नाव सुचवले आहे.”

Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
raj kapoor prepare dimple kapadia look in bobby
‘बॉबी’ सिनेमासाठी ‘या’ अभिनेत्याने तयार केला होता डिंपल कपाडिया यांचा लूक; खुलासा करत म्हणाल्या, “मला खूप त्रास…”
Neelam Kothari
“ती खूप घाबरली…”, समीर सोनीने सांगितला पत्नी नीलम कोठारीचा किस्सा; म्हणाला, “तुम्ही विशीत असताना…”
Netizens Trolled Marathi actress Prajakta Mali, know
“फरसाण खायचं बंद कर”, ऑरा जपण्यासाठी प्राजक्ता माळी काय करते ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “गावात राहणारा माणूस…”
neelam kothari
पतीने चित्रपटासाठी इंटिमेट सीनचे शूटिंग केल्यावर नीलम कोठारी झालेली नाराज; अभिनेता म्हणाला, “तिला एका मैत्रिणीने…”
the dirty picture vidya balan
‘द डर्टी पिक्चर’चा दुसरा भाग येणार का? विद्या बालनच मोठं विधान; म्हणाली, “मी पुन्हा…”

अ‍ॅण्ड’ हा आपल्या नावाचा भाग आहे, असं तब्बसूम यांना का वाटायचं? जाणून घ्या रंजक गोष्ट

तबस्सूम यांच्याविषयी बोलताना तो पुढे म्हणाला “आम्ही एका कार्यक्रमानिमित्त लंडनला गेलो होतो. त्या कार्यक्रमादरम्यान मी आजारी पडलो माझ्याकडे औषधासाठी पैसे नव्हते. त्यांना ही गोष्ट समजताच त्या तडक माझ्याकडे निघून आल्या, माझ्यावर रागावल्या आणि माझ्या हातात औषधासाठी पैसे देऊन मला डॉक्टरकडे घेऊन गेल्या. त्यांच्या नातीच्या लग्नात आमची शेवटची भेट झाली होती.” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

तबस्सूम यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘नर्गिस’ चित्रपटातून बालकलाकार म्हणूनअभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर ‘बैजू बावरा’ चित्रपटातही त्यांनी मीना कुमारी यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. १७७२ ते १९९३ या सलग २१ वर्ष चालणाऱ्या दूरदर्शन वाहिनीवरील ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाचे त्यांनी सुत्रसंचालन केले होते.