२२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले अन् साऱ्या जगभरात याची दखल घेतली गेली. मोठमोठ्या राजकीय नेत्यांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी या सोहळ्याला हजेरी लावली. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, रजनीकांत, कतरिना कैफ, विकी कौशल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, राम चरण, चिरंजीवी, रोहित शेट्टी अशा कित्येक सेलिब्रिटीजनी या सोहळ्याला हजेरी लावली.

अयोध्येमध्ये उपस्थित असलेल्या या सेलिब्रिटीजचे बरेच फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता याच काही सेलिब्रिटीजना आणि एकूणच बॉलिवूडला कॉमेडीयन राजीव निगम यांनी एक व्हिडीओ शेअर करत ट्रोल केलं आहे. एक जुना व्हिडीओ राजीव यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बरेच कलाकार हे जात आणि धर्मापलीकडे विचार करून आपण भारतीय आहोत हा संदेश देतान दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
nsa ajit doval to visit russia for brics meeting
अजित डोभाल यांचा ‘ब्रिक्स’ बैठकीसाठी रशिया दौरा; रशिया-युक्रेन युद्धावर चर्चेची शक्यता
Sukoon Scheme in Family Courts to settle pending cases of family disputes Pune news
कौटुंबिक न्यायालायात ‘सुकून’ योजना; कौटुंबिक वादाची प्रलंबित प्रकरणे मिटवण्यासाठी प्रयत्न
traders Maharashtra bandh marathi news
व्यापाऱ्यांचा राज्यस्तरीय बंद स्थगित
Employees right not to work after office hours What would Australias Right to Disconnect law look like
कार्यालयीन वेळेनंतर काम न करण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार… कसा असेल ऑस्ट्रेलियातील ‘राइट टू डिस्कनेक्ट’ कायदा?
How did Indian mango reach China and Pakistan?; India and China face off over mangoes
India-China mango history:आंबा भारताचा, श्रेय घेतंय पाकिस्तान आणि उत्पादनात अग्रेसर चीन; भारतीय आंबा व्हाया पाकिस्तान चीनमध्ये पोहोचलाच कसा?
Prime Minister Narendra Modis visit to Poland and Ukraine is for the future
मोदींची पोलंड, युक्रेन भेट ‘मध्यस्थी’साठी नव्हे… भवितव्यासाठी!

आणखी वाचा : आयुष्मान खुरानाचा ‘दिल दिल पाकिस्तान’ गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय? जाणून घ्या

जात-पात, धर्म यावरुन लोकांमध्ये द्वेष पसरवण्याबाबतीत जगजागृतीसाठी ही जाहिरात तयार करण्यात आली होती. आमिर खान, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, आशुतोष गोवारीकरसारखे बरेच मोठे कलाकार या व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. व्हिडीओच्या सुरुवातीला आमिर खान दिसत आहे. आमिर म्हणतो, “धर्माच्या नावावर बरेच लोक गुन्हे करतात. कोणताही देव किंवा खुदा हे गुन्हे माफ करेल का?”यानंतर सचिन तेंडुलकर म्हणतो, “जेव्हा तुम्ही मैदानावर असता तेव्हा तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम याच्याशी देणं घेणं नसतं. मी सचिन तेंडुलकर आहे आणि सर्वप्रथम मी भारतीय आहे.”

यानंतर अमिताभ बच्चन, अनुपम खेर, शबाना आजमी, झाकीर खान, तब्बू असे कित्येक कलाकार आम्ही पहिले भारतीय आहोत असा संदेश देताना दिसतात. हा व्हिडीओ शेअर करत राजीव निगम यांनी बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटमध्ये राजीव निगम लिहितात, “हा पहा जुना व्हिडीओ, तेव्हा देशात किती द्वेषभावना होती की सचिन आणि बच्चनजी यांना समोर येऊन संदेश द्यावा लागायचा. आता ही मंडळी असा संदेश देताना दिसतात का? याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे की आता देशात शांती आहे कारण रामराज्याची स्थापना झालेली आहे. आता सेलिब्रिटीजना समोर यायची काहीच गरज नाही. जय श्री राम.”