यंदा ख्रिसमसच्या निमित्ताने बॉलीवूडचे कपूर घराणे चांगलेच चर्चेत आहे. सर्वप्रथम रणबीर कपूर-आलिया भट्ट यांनी त्यांची मुलगी राहाचा चेहरा मीडियासमोर दाखवला. या स्टार किडच्या गोंडस चहऱ्याने आणि निरागसतेने लोकांची मने जिंकली. यानंतर, कपूर कुटुंबीयांनी ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला झाला. आता रणबीर कपूरशी संबंधित याच सेलिब्रेशन पार्टीतील एक व्हिडिओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये रणबीरच्या तोंडून असं काही निघालं आहे की ज्यावर चांगलाच हशा पिकला असून लोकांनी त्याला ट्रोलही कारायला सुरुवात केली आहे. संपूर्ण कपूर कुटुंबीयांनी एकत्र येऊन ख्रिसमस साजरा केला. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक जळणारा चॉकलेट केक दिसत आहे. केकवर दारू ओतून हलका स्वाद येण्यासाठी हा प्रकार बऱ्याचदा केलं जातो. या केकवर लायटर रणबीर कपूरने आग लावली आहे. केक कापताना कपूर कुटुंब एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहे. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर हातात सूरी घेऊन केक कापण्याच्या तयारीत दिसत आहे.

केक कटींगला सुरुवात होताच रणबीरच्या तोंडून ‘जय माता दी’ अशी घोषणा ऐकू येत आहे. यामुळे रणबीरला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. आता तर रणबीर आणि कपूर परिवाराविरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रारही करण्यात आली आहे. अद्याप एफआयआर दाखल झालेली नाही. परंतु संजय तिवारी यांनी घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

आणखी वाचा : बिग बींच्या पडत्या काळात अभिषेक बच्चनने ‘असे’ वाचवले पैसे; अभिनेता सेटवर का बनवायचा चहा? कारण जाणून घ्या

व्हिडीओमध्ये रणबीर केकवर दारू ओतून त्याला आग लावत आहे अन् हे करताना त्याच्या तोंडून ‘जय माता दी’ हे शब्द निघाले आहेत. “हिंदू धर्मात इतर दैत्यांची पूजा करताना अग्निदेवाचीही पूजा केली जाते. रणबीर कपूर व त्याच्या कुटुंबीयांनी जाणून बुजून दुसऱ्या धर्मातील सणाचे सेलिब्रेशन करतेवेळी ‘जय माता दी’ म्हंटले आहे ज्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.” असं संजय तिवारी यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केलं आहे.

रणबीरच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कॉमेंट केल्या आहेत. तर काहींनी त्याल ट्रोलही केलं आहे. कपूर कुटुंबीय हे ख्रिसमस एवढ्या धूमधडाक्यात साजरं का करतात असा सवालही बऱ्याच लोकांनी केला आहे. त्यावर एका यूझरने कॉमेंट करत कारण सांगितलं आहे. कपूर परिवारात ख्रिसमस साजरा करायची परंपरा शशी कपूर यांनी जेनीफरशी लग्न केल्यानंतर सुरू झाली, अन् त्यांच्या पश्चातआजही कपूर कुटुंब एकत्र येऊन ख्रिसमस साजरा करतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint filed against ranbir kapoor and family for hurting religious sentiments avn