कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहे. सुकेशशी संबंध असल्याच्या कारणावरून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही या प्रकरणी अडचणीत आली आहे. तिचीही बऱ्याचदा चौकशी झाली आहे. अशातच आता सुकेशने होळीनिमित्त जॅकलिनला पत्र लिहिलं आहे. या पत्राची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
“मी सर्वात शानदार, अद्भुत व्यक्ती, माझ्या जॅकलिनला होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. रंगांचा सण असलेल्या होळीनिमित्त मी तुला वचन देतो की या वर्षी मी माझ्या स्टाइलमध्ये पूर्ण जोमाने आणि ब्राइटनेसह तुझ्या आयुष्यातून निघून गेलेले रंग १०० पट वाढवून परत आणीन. मी वचन देतोय आणि ही माझी जबाबदारीही आहे. तुला माहीत आहे की मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाईन, मी तुझ्यावर प्रेम करतो, कायम हसत राहा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माय बेबी गर्ल, माय जॅकी” असं तो म्हणाला आहे. सुकेशने या पत्रात आपले कुटुंबीय व मित्रांनाही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
MC Stan च्या कॉन्सर्टमध्ये शिव ठाकरेचीच हवा; सुंबूलबरोबर केला जबरदस्त डान्स, Video पाहिलात का?
दरम्यान, सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. सध्या तो तुरुंगात आहे. त्याच्यावर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. जॅकलिन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन जाळ्यात ओढले होते. या दोघींशिवाय सारा अली खान, चाहत खन्ना यांचेही नाव यात आले होते. त्याने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.