बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने नुकताच कुंभमेळ्यात संन्यास घेतला आहे. त्यामुळे ममता कुलकर्णी मोठ्या चर्चेत आहे. संन्यास घेण्याबरोबरच अभिनेत्रीला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर पद दिले गेले आहे. आता मात्र यावरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी ममता कुलकर्णीला दिलेल्या पदावर प्रश्न निर्माण केले आहेत. नुकताच त्यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेबरोबर संवाद साधला.

किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी काय म्हणाल्या?

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी म्हटले, “पहिली गोष्ट तर मला अशी विचारायची आहे की, किन्नर आखाडा कोणासाठी तयार केला गेला होता? किन्नर समाजासाठी तयार केला गेला होता. आता मात्र, एका महिलेला किन्नर आखाड्यात स्थान दिले. तर मला असे म्हणायचे आहे की, किन्नर आखाड्यात जर तुम्ही महिलांना स्थान देत असाल, तर त्याचे नाव बदला. दुसरे कोणतेतरी नाव ठेवा. अनेक कलाकार या कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी आले आहेत. भाग्यश्री, हर्षा रिछारियासुद्धा आली. आम्ही कोणावर कधी टिप्पणी केली नाही. मात्र, आज का हे बोलावे लागते. कारण- ममता कुलकर्णीसारखी फिल्मस्टार, जिचा संबंध डी-कंपनीबरोबर आहे. जी ड्रग्जच्या आरोपाखाली तुरुंगातही गेली आहे. तरीसुद्धा तुम्ही तिला दीक्षा देता आणि कोणतेही शिक्षण न देता तुम्ही तिला महामंडलेश्वरच्या पदावर बसवता. कोणालाही दीक्षा देऊन महामंडलेश्वरच्या इतक्या मोठ्या पदावर बसवाल का? समाजाला तुम्ही कोणता गुरू देत आहात? हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यांना महामंडलेश्वर बनवण्यापाठीमागे काय कारण आहे? पट्टा अभिषेक केला. केसांची एक बट कापली आहे, मुंडन केले नाही. संन्यास, दीक्षा घेण्याचे हे कारण आहे का? पहिली गोष्ट तर ममता कुलकर्णीची पार्श्वभूमी बघितली गेली पाहिजे होती. डी-कंपनीबरोबर तिचे संबंध होते. अचानक ती भारतात आली, अचानक ती कुंभ मेळ्यात आली, तिचे व्हिडीओ व्हायरल झाले. परत तिला महामंडलेश्वरचे पदसुद्धा मिळाले? तर या सगळ्या गोष्टींमागे काय सत्य आहे? या सगळ्याचा तपास केला पाहिजे. आताच्या काळात पब्लिसिटी स्टंटसाठी आखाडा काहीही करू शकतो. याचा मी निषेध करते.”

udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
R Madhavan wife Sarita thinks he is a fool
“माझ्या पत्नीला वाटतं की मूर्ख आहे”, आर माधवन मराठमोळ्या बायकोबद्दल असं का म्हणाला?
Mamta Kulkarni reacts on doing movies after taking sanyas
ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर होण्यासाठी का निवडला किन्नर आखाडा? सिनेविश्वात परतणार का? उत्तर देत म्हणाली…
mamta kulkarni marathi bramhan family
मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, ती ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींची आहे नातेवाईक
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
who is afsar zaidi saif ali khan friend
सैफ अली खानच्या मेडिकल फॉर्मवर कुटुंबियांचं नाही, तर ‘त्या’चं नाव; कोण आहे तो? त्याने सही का केली?
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

दरम्यान, ममता कुलकर्णी ही काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती भारतात परतली आहे. ममता कुलकर्णीने १९९० च्या दशकात करण अर्जुन आणि बाजी यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००० च्या काळात ती बॉलीवूडपासून दूर गेली आणि गेली २५ वर्षे ती दुबईत वास्तव्यास होती.

Story img Loader