चित्रपट समीक्षक व बॉलिवूड अभिनेता कमल रशीद खान(केआरके) विरोधात इंदौर पोलिसांकडून अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे केआरकेवर अटकेची टांगती तलवार आहे. बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीचा सोशल मीडियावर ‘नशेडी’ असा उल्लेख केल्यामुळे केआरकेवर ही कारवाई करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये मनोज वाजपेयीचा उल्लेख “व्यसनाधीन व नशेडी” असा केला होता. याबाबत बाजपेयीने केआरकेविरोधात तक्रार दाखल केली होती. बाजपेयीचे वकील परेश जोशी यांनी शुक्रवारी(१७ मार्च) याबाबत माहिती दिली. “दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर केआरकेविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी १० मे ला होणार असून तोपर्यंतर केआरकेला न्यायालयात कालावधी देण्यात आला आहे”, असं ते म्हणाले.

हेही वाचा>> “शाहरुख खान मला गुडघ्यापर्यंत कपडे…” गौरी खानने केलेला खुलासा

नेमकं प्रकरण काय?

केआरकेच्या एका ट्विटर हँडलवरुन २०२१ मध्ये केलेल्या ट्वीटमध्ये मनोज बाजपेयीचा नशेडी म्हणून उल्लेख करण्यात आला होता. ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजसाठी हे ट्वीट करण्यात आलं होतं. यानंतर बाजपेयीने केआरकेविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

हेही वाचा>> Video: एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमध्ये बजरंग दलचा हंगामा, रॅपरच्या गाण्यावर आक्षेप घेत कार्यक्रम केला रद्द

केआरकेने या संपूर्ण प्रकरणानंतर त्या ट्विटर अकाऊंटची मालकी २०२० सालीच विकल्याचा दावा केला होता. याप्रकरणी १३ डिसेंबर २०२२ मध्ये केआरकेने मध्य प्रदेशातील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मनोज बाजपेयीबाबत कोणतंही ट्वीट केलं नसून हा खटला रद्द करण्याची मागणी या याचिकेतून त्याने केली होती. परंतु, न्यायालयाने केआरकेची याचिका फेटाळून लावली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court issue arrest warrant against krk in the manoj bajpayee defamation case kak