बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अथिया भारताचा स्टार क्रिकेटर के.एल.राहुलशी लग्नगाठ बांधणार आहे. २३ जानेवारीला दोघेही विवाहबद्ध त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यावर अथिया व के.एल.राहुलचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अथिया व के.एल.राहुलच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना आजपासून सुरुवात होणार आहे. मेहेंदी, संगीत व हळदी समारंभाची धामधूम पाहायला मिळणार आहे. अथिया व के.एल.राहुलच्या लग्नाची सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यावर जय्यत तयारी सुरू आहे. त्याच्या बंगल्यावरील एक व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा>> ‘बिग बॉस मराठी’ फेम विकास सावंत करतोय ऑलिम्पिकची तयारी, म्हणाला “माझी ताकद…”

‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बंगल्यावर अथिया व के.एल.राहुलच्या लग्नासाठी मंडप उभारलं असून डेकोरेशन केल्याचं दिसत आहे. अथिया व के.एल.राहुलच्या लग्नासाठी संपूर्ण बंगला सजवण्यात आला आहे.

हेही वाचा>> मुंबईच्या ट्राफिकबाबत अक्षया देवधरची पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली “आता शेंगदाणे विकू…”

अथिया व के.एल.राहुलच्या लग्नात बॉलिवूड कलाकरांसह क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अथिया शेट्टी व के.एल.राहुल रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक कार्यक्रमांतही त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer kl rahul athiya shetty wedding preparations start at sunil shetty khandala bunglow video kak