Shubman Gill Avneet Kaur:क्रिकेटपटू शुबमन गिलच्या अफेअरच्या चर्चा नवीन नाही. अभिनेत्री रिद्धिमा पंडितनंतर आता दुसऱ्या एका अभिनेत्रीबरोबर त्याचं नाव जोडलं जात आहे. ही अभिनेत्री म्हणजे अवनीत कौर होय. २३ वर्षांची अवनीत व शुबमन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा अभिनेत्रीच्या एका पोस्टनंतर होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत व न्युझीलंड यांच्यादरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबईत खेळला गेला. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर अवनीतने आनंद व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. पण ५ दिवसांपूर्वी तिने दुबईतील स्टेडियममधील काही फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे तिच्या व शुबमनच्या डेटिंगच्या चर्चा होत आहेत.

अवनीतने शुबमनच्या वाढदिवसाला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यानंतर तिने दुबईतील फोटो शेअर केले, त्यामुळे अवनीत व शुबमन एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. पण या दोघांनीही याबद्दल अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोण आहे अवनीत कौर?

अवनीत कौर २०१० मध्ये ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर’मध्ये झळकली होती. त्यानंतर ती डान्स के सुपरस्टार्समध्ये सहभागी झाली. २०१२ साली ‘मेरी मा’ या शोमधून तिने अभिनयाला सुरुवात केली. तिने ‘झलक दिखला जा’, ‘सावित्री एक प्रेम कहानी’, ‘एक मुठ्ठी आसमां’ या मालिका व रिअॅलिटी शोमध्ये काम केलं. अवनीतने २०१४ मध्ये ‘मर्दानी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

अवनीत कौरची पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम)

अवनीत ‘हमारी सिस्टर दिदी’मधून पुन्हा टीव्हीवर परतली. तिने ‘चंद्र नंदिनी’ मालिकेत राजकुमारी चारुमतीची भूमिका केली होती. त्यानंतर तिने ‘अल्लादिन-नाम तो सुना ही होगा’मध्ये सुल्ताना यास्मिन हे पात्र साकारले होते. अवनीतने नवाजुद्दीन सिद्दिकीबरोबर ‘टिकू वेड्स शेरू’ या सिनेमात मुख्य भूमिका केली होती. या चित्रपटाची निर्मिती कंगना रणौतने केली होती.

अवनीतने एमएक्स प्लेयरच्या ‘पार्टी टिल आय डाय’मध्ये काम केलं. ती ‘लव्ह इन व्हिएतनाम’मध्येही झळकली होती. अवनीतने ‘केसरियो रंग’, ‘पागला’, ‘किन्ने सालां बाद’, ‘एक्स कॉलिंग’, ‘तेनू नी पता’ या म्युझिक व्हिडीओतही काम केलं आहे. अवनीतचं नाव शुबमनआधी प्रोड्युसर राघव शर्माशी जोडलं गेलं होतं.

शुबमनच्या अफेअरच्या चर्चा नवीन नाही. त्याचं नाव अभिनेत्री सारा अली खान, सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर व अभिनेत्री रिद्धिमा पंडित यांच्याशी जोडलं गेलंय.