विराट, अनुष्का या जोडीकडे एक आदर्श जोडी म्हणून बघितले जाते. दोघे एकमेकांच्या करियरमध्ये व्यस्त जरी असले तरी एकमेकांसाठी वेळ काढत असतात. मध्यंतरी दोघांचा मुंबईमध्ये गाडीवर फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दोघे सोशल मीडियावरदेखील सक्रिय असतात. दोघांचे चाहते त्यांच्या फोटोस पोस्टना भरभरून प्रतिसाद देत असतात. दोघांची लव्हस्टोरी आज जगजाहीर आहे. मात्र विराटने कधीच अनुष्काला प्रपोज केलं नव्हतं.

आज बॉलिवूड स्टार कपलच्या लव्हस्टोरी चर्चेत असतात. विराट अनुष्काच्या प्रेमकहाणीत विराटने कधीच अनुष्काला प्रपोज केले नव्हते. एका मुलाखतीत त्याने याबद्दल खुलासा केला होता, तो असं म्हणाला होता की कधीही अनुष्काला प्रपोज केले नव्हते. कारण मला माहित होते आम्ही एक दुसऱ्यासाठी बनले आहोत.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Should a divorced wife receive maintenance under any circumstances
घटस्फोटीत पत्नीला कोणत्याही परिस्थितीत निर्वाहनिधी मिळालाच पाहिजे का?
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
kumar vishwas
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Conflict in Mahayuti over post of Guardian Minister of Raigad aditi tatkare bharat gogawale
रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत संघर्ष

“तो गर्विष्ठ…” अनुष्का शर्माने सांगितली तिच्या आणि विराट कोहलीच्या पहिल्या भेटीची आठवण

फुटबॉल दिग्गज सुनील छेत्रीशी झालेल्या संवादांमधून कोहलीने सांगितले की, त्याने कधीही अनुष्काला प्रपोज केले नाही. तो म्हणाला की जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डेसारखा असू शकतो आणि खास असू शकतो. आम्हाला कधीच प्रपोज करण्याची गरज वाटली नाही. आम्ही एकमेकांशी लग्न करणार आहोत हे आम्हाला नेहमीच माहीत होते. याबाबत आमच्यात कधीच शंका आली नाही.

११ डिसेंबर २०१७ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघांनी इटलीमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाचा स्वागत समारंभ सोहळा हा दिल्लीत पार पडला होता. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आज त्यांच्या लग्नाला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव वामिका आहे. अनुष्का तब्बल ५ वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘चकडा एक्सप्रेस’ मध्ये ती दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Story img Loader