बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर ३’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. ‘टायगर ३’मध्ये प्रेक्षकांना सलमानबरोबर कतरिनाचाही अ‍ॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा पहिला शोचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग पाहता याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाबद्दल बरीच लोक कौतुक करत आहेत तर काही लोक या चित्रपटावर टीकाही करत आहेत. बॉलिवूडचा एक प्रसिद्ध समीक्षक व अभिनेता या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर कायम नकारात्मक ट्वीट करताना दिसत आहे. खासकरून सलमान खानबद्दल या अभिनेत्याने सोशल मीडियावर ‘टायगर ३’च्या टीझरपासूनच प्रचंड टीका केली आहे. हा प्रसिद्ध अभिनेता म्हणजे कमाल आर खान म्हणजेच केआरके.

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

आणखी वाचा : ‘गदर २’चे दिग्दर्शन यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा; नाना पाटेकर दिसणार मुख्य भूमिकेत

केआरकेने सलमानच्या ‘टायगर ३’चा टीझर आल्यापासूनच या चित्रपटाबद्दल नकारात्मक भाष्य करायला सुरू केलं. सलमानला म्हातारा म्हणूनच त्याने त्याच्या बऱ्याच ट्वीटमध्ये खिजवलं आहे. आता नुकत्याच एका ट्वीटमधून केआरकेने सलमानसह आमिर खानवरही निशाणा साधला आहे. आपल्या नवीन ट्वीटमध्ये केआरकेने आमिर खानला बुटका व सलमानला म्हातारा म्हणत खिजवलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये केआरके लिहितो, “म्हातारा भाईजान बुटक्याला मागे टाकू शकेल असं मला अजिबात वाटत नाही. जर बुटका फ्लॉप ठरला आहे तर म्हातारादेखील सुपरफ्लॉप आहे. #TigerBuddhaHai हा त्याचा आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटणार आहे कारण केआरके ने याची भविष्यवाणी केली आहे.” या ट्वीटवरुन सोशल मीडियावर बऱ्याच नेटकऱ्यांनी केआरकेला खडेबोल सुनावले आहेत, तर काही चाहत्यांनी सलमानची बाजू घेत केआरकेवर टीका केली आहे.

Story img Loader