बॉलिवूडमधील हुरहुन्नरी अभिनेत्री विद्या बालन तिच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखली जाते. आतापर्यंत तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तिने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. विद्या सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे, पण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अशातच होळीच्या दिवशी विद्याचा एक बोल्डो फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.

नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा अडचणीत; कॉल रेकॉर्डिंग शेअर करत भाऊ शमासचा गंभीर खुलासा, व्हिडीओ जाहीर करण्याचाही इशारा

JNU plans Shivaji centre
छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा अन् मराठा लष्करी इतिहास, JNU मध्ये आता विशेष केंद्र; कधी सुरू होणार अभ्यासक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…

बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीने विद्याचा हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. हा फोटो पाहून विद्याने आता बोल्ड फोटोशूट केल्याचं नेटकऱ्यांना वाटत होतं. त्यावरून तिला ट्रोलही केलं गेलं. पण हा फोटो आताचा नाही. हा फोटो जवळपास आठ वर्षे जुना आहे.

“हे तुला शोभतं का?” विद्या बालनचं न्यूड फोटोशूट, ‘तो’ फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा राग अनावर

विद्याचा हा फोटो न्यूड आहे. या फोटोमध्ये विद्याच्या एका हातात वर्तमानपत्र दिसत आहे. तर दुसऱ्या हातात एक कप आहे. शिवाय तिने गॉगलही लावलेला यामध्ये दिसत आहे. विद्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अशातच या फोटोबद्दलची माहितीही समोर आली आहे.

हा फोटो आजचा नाही, तर आठ वर्षे जुना आहे. विद्याने २०१५ मध्ये डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केलं होतं. मात्र, बऱ्याच वर्षांनी डब्बूने हा फोटो पुन्हा शेअर केला आणि तो व्हायरल झाला. फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केलं. ‘असे कलाकार कोणाचे आदर्श असूच शकत नाहीत’, ‘द डर्टी चित्रपटाची आठवण आली’, ‘हे तुला शोभतं का?’ ‘डर्टी पिक्चर 2 येतोय का?’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader