भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा २०२३’ नुकताच रंगला. सोमवारी २० फेब्रुवारी रोजी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर बॉलिवूड अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याची चांगली धामधूम पाहायला मिळाली. यावेळी अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि तिच्या सिनेसृष्टीतील योगदानासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
आणखी वाचा : Video : गाडीतून उतरली, रेखा यांच्या तोंडाजवळ गेली अन्… आलिया भट्टचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

पण रणबीर हा आगामी चित्रपटाच्या शूटींगनिमित्ताने बाहेर असल्याने तो या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही.त्यामुळे आलियाने रणबीरच्या वतीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार स्वीकारला.

जाणून घ्या विजेत्यांची यादी…

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट: द काश्मीर फाइल्स
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: आर बाल्की (चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र: भाग १)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)
  • मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेता: ऋषभ शेट्टी (कांतारा)
  • चित्रपट उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ पुरस्कार: रेखा
  • सर्वोत्कृष्ट वेब सिरीज: रुद्र: द एज ऑफ डार्कनेस
  • क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता: वरुण धवन (भेडिया)
  • वर्षभरातील सर्वोत्तम चित्रपट: RRR
  • वर्षभरातील सर्वोत्तम दूरदर्शन मालिका: अनुपमा
  • यंदाच्या वर्षातील सर्वात अष्टपैलू अभिनेता: अनुपम खेर (काश्मीर फाइल्स)
  • टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: झैन इमाम (फना-इश्क में मरजावा)
  • सर्वोत्कृष्ट पुरुष गायक: सचेत टंडन (मैय्या मैनु)
  • सर्वोत्कृष्ट गायिका: नीती मोहन, मेरी जान
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर: पीएस विनोद (विक्रम वेधा)
  • संगीत उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ पुरस्कार: हरिहरन

आणखी वाचा : “माझी एक चूक आणि अमिताभ बच्चन…” शत्रुघ्न सिन्हा यांना आजही होतो ‘त्या’ गोष्टींचा पश्चात्ताप

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला ‘या’ सेलिब्रिटींनी लावली हजेरी

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. यात आलिया भट्ट, रेखा, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर बाल्कीसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dadasaheb phalke international film festival awards 2023 check out full winners list nrp
Show comments