आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात छोट्या बबिता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं अवघ्या १९ व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘दंगल’ चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर होती. याशिवाय सुहानी सोशल मीडियावर देखील सक्रिय नव्हती.

जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्रीचा काही दिवसांपूर्वी पाय फ्रॅक्चर झाला होता. उपचारादरम्यान चालू असलेल्या औषधांचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला. अहवालानुसार, तिच्या शरीरात अतिरिक्त द्रव जमा होऊन तिचं निधन झालं. हेच सुहानीच्या अकाली निधनाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा : “रोज सकाळी कचरा जाळतात अन्…”, परिसरातील ‘तो’ प्रकार पाहून मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट; म्हणाली, “हा कामचुकारपणा…”

गेल्या काही दिवसांपासून सुहानीवर फरीदाबाद येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी ( १६ फेब्रुवारी ) रात्री तिचं निधन झालं. शनिवारी फरीदाबाद येथे तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : भव्य सजावट, पांढऱ्या रंगाची थीम अन्…; ‘असा’ पार पडला पूजा सावंतचा साखरपुडा! बहिणीने शेअर केली खास झलक

सुहानी इन्स्टाग्रामवर फारशी सक्रिय नव्हती. तिची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट नोव्हेंबर २०२१ ची आहे. ‘दंगल’नंतर अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेतला होता. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिने चित्रपटाच्या ऑफर्स स्वीकारल्या नव्हत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर मनोरंजन विश्वाकडे वळणार असल्याचं तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.

Story img Loader