‘दंगल’फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ती अवघ्या १९ वर्षांची होती. सुहानीच्या आकस्मिक निधनाने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सुहानी एका दुर्मीळ आजाराने त्रस्त होती. गेल्या काही महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, एका मुलाखतीत सुहानीच्या आईने लेकीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुहानीची आई पूजा भटनागर यांनी नुकतीच एनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सुहानीच्या आठणवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, “सुहानीने समाजात आमच्यासाठी अभिमानाची भावना निर्माण केली आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या नावाने ओळखले जाते याचा अभिमान वाटतो. समाजात आम्हाला जी ओळख मिळाली ती सुहानीमुळेच. ‘हे दंगल गर्लचे आई-वडील आहेत’ असे लोक आम्हाला म्हणायचे. आम्ही कुठेही गेलो तरी तिच्या नावानेच आमची ओळख व्हायची. आमच्या मुलीचा आम्हाला खूप अभिमान आहे.”

हेही वाचा- जॅकी-रकुल प्रीतची लगीनघाई! मेहुण्याच्या लग्नासाठी गोव्यात पोहोचले आमदार धिरज देशमुख, पाहा Video

‘दंगल’नंतरही आमिर खान सुहानीच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होता. आमिर किंवा त्याच्या प्रॉडक्शन टीमला सुहानीच्या प्रकृतीबद्दल कोणीही माहिती दिली नव्हती. याबाबत बोलताना पूजा भटनागर म्हणाल्या की, “जर आम्ही आमिर खानला सुहानीच्या स्थितीबद्दल सांगितले असते तर त्याने नक्कीच मेसेज किंवा कॉलद्वारे याबाबत विचारणा केली असती. तसेच तो मदतीसाठीही पुढे आला असता. आमिर आमच्या संपर्कात आहे. तो एक चांगला माणूस आहे. तो नेहमीच सुहानीच्या संपर्कात असतो. आम्ही त्यांना सांगितले नाही, कारण आम्ही स्वतः खूप काळजीत होतो. त्यामुळे आम्ही कोणालाही माहिती दिली नाही. पण, त्याला मेसेजही केला असता तर नक्कीच त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला असता. आमिरच्या मुलीच्या लग्नाचे रीतसर निमंत्रण आम्हाला मिळाले होते. एवढंच नाही तर त्याने आमंत्रणाचा आम्हाला फोनही केला होता.”

‘दंगल’ नंतर सुहानीने कोणत्याच चित्रपटात काम केले नाही. तिने काही जाहिराती केल्या. तिला अभिनय क्षेत्रातच करिअर करायेच होते. पण सुहानीने पहिल्यांदा आपलं शिक्षण पूर्ण करावं अशी तिच्या आई-वडिलांचाी इच्छा होती. आभ्यासात सुहानी हुशार होती. कॉलेजच्या शेवटच्या सेमिस्टरमध्येही तिने पहिला क्रमांक पटकावला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangal girl suhani bhatnagar passes away mother pooja bhatnagar emotional dpj