तारे जमीन पर या सिनेमातला इशान अवस्थी अर्थात दर्शिल सफारी हा गोंडस मुलगा सगळ्यांनाच आठवत असेल. दर्शिलच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. त्याने आमीर खानसारख्या नटाबरोबर केलेलं काम प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडलं होतं. हाच दर्शिल काही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत होता. त्याचा इंस्टाग्रामवरील डॅशिंग लूक पाहून लोकांचा विश्वासच बसत नव्हता. दर्शिल सध्या त्याच्या ‘हुकुस बुकूस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच चित्रपटानिमित्त मीडियाशी संवाद साधतांना त्याने त्याच्या अनुभवाबद्दल आणि चित्रपट क्षेत्रातील प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधतांना दर्शिल म्हणाला, “जेव्हा मी अभ्यासावर लक्षकेंद्रित करून मगच अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला तेव्हा बऱ्याच लोकांचा हा गैरसमज झाला की मी अभिनय सोडला आहे. पण मी माझ्या वैयक्तिक विकासावर मेहनत घेत होतो हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. मी कोणताही शॉर्टकट घेणार नाही हा निश्चय मनाशी केला होता. नंतर मी रंगभूमीवर काम केलं.”

आणखी वाचा : बिग बींच्या पडत्या काळात धीरूभाई अंबानींनी पुढे केलेला मदतीचा हात; आठवण सांगताना महानायक म्हणाले…

पुढे दर्शिल म्हणाला, “नंतर मी पुन्हा चित्रपटात काम करायचा निर्णय घेतला, त्यासाठी मी तब्बल १०० ऑडिशन्स दिल्या. त्यातील काहीच ऑडिशन माझ्यासाठी चांगल्या गेल्या. आजकाल तर मोठमोठे अभिनेतेसुद्धा ऑडिशन द्यायला पुढे मागे बघत नाहीत. त्या पात्रासाठी योग्य अभिनेता सापडणं हे फार महत्त्वाचं असतं.” याबरोबरच दर्शिलने या मुलाखतीमध्ये आमिर खानविषयीसुद्धा भाष्य केलं.

दर्शिलच्या जवळचे लोक त्याला आमिर खानकडून मार्गदर्शन किंवा सल्ला घ्यायला सांगतात का, या प्रश्नाचं उत्तर देताना दर्शिल म्हणाला, “माझ्या जवळचे सगळेच हा सल्ला मला देतात, अर्थात ते माझ्या भल्यासाठीच सांगतात. माझा कोणताही निर्णय चुकू नये हाच उद्देश त्यामागे असतो, पण मी फार लाजाळू आहे, माझ्या नुकत्याच आलेल्या चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा मी अद्याप आमिर यांना पाठवलेला नाही. जर मी खरंच उत्तम काम केलं असेन तर ते आपसूक त्यांच्यापर्यंत पोहोचेलच असं मला वाटतं.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Darsheel safary speaks about his acting skills and guidance from aamir khan avn