दोन दिवसांपूर्वी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आणि त्यानंतर या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. विषप्रयोगानंतर त्याची प्रकृती खालावली आणि त्याला पाकिस्तानच्या कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती आली होती. पण याची अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही. दाऊदबद्दलच्या बातम्या येताच त्याच्या कुटुंबाची चर्चाही चालू झाली.

एकेकाळी दाऊदचा बॉलीवूडवरही प्रभाव होता. दाऊद इब्राहिमच्या पत्नीचे नाव मेहजबीन उर्फ ​​जुबिना जरीना आहे. दाऊदच्या मुलाचे नाव मोईन इब्राहिम आहे तर मोठ्या मुलीचे नाव माहरुख आणि धाकटीचे नाव माहरीन आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदादचा मुलगा जुनैद मियांदादशी दाऊदची मोठी मुलगी माहरुखचं लग्न झालं आहे. दाऊदची मोठी मुलगी माहरुखचा एक फोटो तिच्या लग्नानंतर खूप व्हायरल झाला होता. या फोटोत त्याची मुलगी कमालीची सुंदर दिसत होती.

आई अन् आजी सुपरस्टार, अभिनेत्याबरोबरच्या एका MMS ने संपवलं ‘या’ अभिनेत्रीचं करिअर; आता काय करते? वाचा

dawood ibrahim daughter
दाऊद इब्राहिमच्या मुलीचा व्हायरल फोटो (सौजन्य – सोशल मीडिया)

जुनैद आणि माहरुखचे लग्न २००६ मध्ये झाले होते. त्याच वर्षी दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये माहरुख व जुनैदच्या लग्नाचा एक कार्यक्रम झाला होता. त्यानंतर माहरुखच्या लग्नादरम्यानचा तिचा फोटो समोर आला होता. त्या फोटोत ती दागिन्यांनी सजलेली दिसत होती. तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होते. रिपोर्ट्सनुसार, माहरुख आणि तिचा पती जुनैद खूप ऐशोआरामात जीवन जगतात. दाऊदने आपल्या संपत्तीतील मोठा वाटा मुलगी आणि जावयालाही दिला आहे, असं वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिलं आहे.

Story img Loader