दीपक तिजोरी हा ९० च्या दशकातील बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता होता. एकेकाळी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा हा अभिनेता आता सिनेसृष्टीत फारसा सक्रिय नाही, पण लवकरच तो ‘टिप्सी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो सध्या त्याच्या या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे, त्याने १९९० च्या दशकातील हिंदी चित्रपट उद्योगाबद्दल मत मांडलं. तसेच त्याकाळी कलाकार एकमेकांना मदत करायचे, पाठिंबा द्यायचे, याचा उल्लेखही त्याने केला.
दीपकने सैफ अली खान व त्याची तेव्हाची पत्नी अभिनेत्री अमृता सिंह यांचा एक किस्सा सांगितला. दीपकने ‘पहला नशा’ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. या चित्रपटासाठी सैफ त्याला सपोर्ट करत होता, पण अमृताने त्याला मदत करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता, या घटनेमुळे आपल्याला धक्का बसला होता, असं दीपकने म्हटलंय. नेमकं काय घडलं होतं, ते जाणून घेऊयात.
‘मिर्झापूर’, ‘पंचायत’, ‘आश्रम’ अन्…; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिजचे पुढचे सीझन ओटीटीवर केव्हा येणार?
दीपकने सांगितलं की त्याच्या पहिल्या चित्रपटात कॅमिओसाठी त्याच्या काही सेलिब्रिटी मित्रांची मदत हवी होती. त्यावेळी आमिर खान, शाहरुख खान आणि सैफ अली खान यांनी त्याला पाठिंबा देण्यासाठी येणार असल्याचं वचन दिलं होतं. पण याच दरम्यान घडलेल्या एका प्रसंगाने दीपकला धक्का बसला होता, याबद्दल त्याने झूमला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. “एक वेळ अशी आली होती, ज्यामुळे मी खरंच आश्चर्यचकित झालो होतो… शाहरुख (खान), सैफ (अली खान) आणि आमिर हे तिघेही येणार होते. तर सैफ घरी तयार होत होता, तो घरी तयार होत असताना त्याची तेव्हाची पत्नी डिंगीने (अमृता सिंह) त्याला विचारलं, ‘तू काय करतोय? तू कुठे जातोय?”
सैफने त्यावेळी अमृताला दीपकच्या चित्रपटाबद्दल सांगितलं. त्यानंतर अमृताने त्याला जाऊ नकोस असं म्हटलं. अमृता सैफला काय म्हणाली होती, तेही त्याने सांगितलं. “तर, ती म्हणाली, ‘खरंच? तू असं कसं करू शकतो? आम्ही या सर्व गोष्टी कधीच केल्या नाहीत. हे कोण करतं? तसं असेल तर प्रीमियर शूटवर जा आणि कोणाला तरी सपोर्ट कर.” तिचं हे बोलणं ऐकून मला धक्का बसला होता, कारण ९० च्या दशकात बॉलीवूडमधील कलाकार एकमेकांना सपोर्ट करायला जायचे, आता तसं होत नाही, हे पाहून वाईट वाटतं, असं दीपक म्हणाला.
बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी
दीपक ‘जो जीता वही सिकंदर’, ‘कभी हां कभी ना’, ‘बादशाह’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पहला नशा’ हा मुख्य अभिनेता म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता.