बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणचा समावेश होता. कोणाचेही पाठबळ नसताना तिने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने मॉडेलिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. अभिनयासाठी तिला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला, महाविद्यालयात जाणे शक्य नव्हते. यासंदर्भात खुलासा करतानाचा दीपिका पदुकोणचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “…म्हणून आज टिव्ही माध्यमाचा आदर करतो”, स्वानंदी टिकेकरने सांगितला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेचा अनुभव

दीपिका पदुकोणचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ २०१७ मधील आहे. हेमा मालिनी यांच्या जीवनावर आधारित ‘बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दीपिकाने तिच्या वैयक्तिक आणि शालेय आयुष्याबाबत भाष्य केले होते. “काहीतरी मिळवण्यासाठी तुम्हाला आयुष्यात त्याग करावाचं लागतो” असे दीपिका या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

हेही वाचा : “इतकी लाज नको सोडू…”, सुव्रत जोशीने सांगितला ‘दिल दोस्ती’च्या ऑडिशनचा किस्सा; म्हणाला, “रात्री मित्रांबरोबर पार्टी करुन…”

अभिनेत्री या व्हिडीओमध्ये म्हणाली, “आयुष्यात त्याग हा आहेच…मला अभिनयासाठी अनेक गोष्टी सोडाव्या लागल्या. मॉडेलिंगसाठी प्रवास सुरु करताना मला दुसऱ्या बाजूला माझे शिक्षण पूर्ण करणे शक्य नव्हते. मी कधीच महाविद्यालयात गेले नाही. ११ वी आणि १२ वीचा अभ्यास मी फक्त पास होण्यासाठी पूर्ण केला होता. त्यावेळेस मी खूप यशस्वी मॉडेल होते आम्ही तेव्हा बंगळुरूमध्ये राहत होतो आणि कामानिमित्त मला वारंवार मुंबई-दिल्ली असा प्रवास करावा लागायचा.”

हेही वाचा : “जावईबापू जिंदाबाद”, सासरहून प्रवीण तरडेंना मिळालं अधिकमासाचं वाण, पत्नीने शेअर केला व्हिडीओ

“किमान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे अशी माझ्या पालकांची इच्छा होती. त्यामुळे मी बाह्य शिक्षण संस्थेतून माझे शिक्षण पूर्ण करण्याचा पूर्ण केला. परंतु, पहिले वर्ष झाल्यानंतर मी ते सुद्धा पूर्ण करू शकले नाही. मी फक्त १२ वी पास आहे. पदवीनंतर मी माझ्या करिअरला सुरुवात करावी अशी माझ्या पालकांची इच्छा होती पण, ते शक्य झाले नाही. त्यांनी मला आयुष्यात खूप पाठिंबा दिला त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी काहीच साध्य करू शकले नसते.” असे दीपिका या जुन्या व्हिडीओमध्ये सांगत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone admits being only 12th pass and she never gone to college due to modelling career sva 00
Show comments