Deepika Padukone and Ranveer Singh Welcome Baby Girl : अखेर बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून दीपिकाच्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरू होती. दीपिका कधी आई होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. दीपिका आणि रणवीर दोघं देखील पहिल्यांदा आई-बाबा होण्यासाठी खूप उत्सुक होते. अशातच आता दीपिका आई झाल्याचं समोर आलं आहे. दीपिका आणि रणवीरच्या घरी लक्ष्मी आली आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी, आज अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे, असं वृत्त ‘इंडिया टूडे’ने दिलं आहे.

हेही वाचा – Video: रश्मी ठाकरेंनी अँटिलियाच्या राजाचं घेतलं दर्शन, सिल्कच्या साडीतील लूकने सर्वांचं वेधलं लक्ष

Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?
Deepika Padukone at Diljit Dosanjh Concert (1)
Video: लेकीच्या जन्मानंतर माहेरी आहे दीपिका पादुकोण, कॉन्सर्टमध्ये दुआच्या आईला पाहून दिलजीत म्हणाला…
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”
swearing in ceremony of new maharashtra cm in mumbai on december 5
‘लाडक्या बहिणीं’च्या साक्षीने शपथविधी; आझाद मैदानावर उद्या भव्य सोहळा; शेतकरी, साधुसंतांना निमंत्रण

अभिनेत्री दीपिका पादुकोणला काल, गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईच्या रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दीपिकाला तिच्या आईबरोबर नेण्यात आलं होतं. यादरम्यानचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आज दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याचं समोर आलं आहे. अद्याप दीपिका किंवा रणवीरने याबाबत अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही.

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’मध्ये होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री, जबरदस्त राडा घालायला येतोय रांगडा गडी, नेटकरी म्हणाले, “कोल्हापुरचा…”

दरम्यान, फेब्रुवारी २०२४मध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आई-बाबा होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर दीपिकाचं बेबी बंप दिसत नसल्यामुळे फेक प्रेग्नेंसी असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. अनेक कार्यक्रमात अभिनेत्री हाय हिल्समध्ये फिरताना दिसली. त्यावरूनही तिला ट्रोल केलं गेलं. पण काही दिवसांपूर्वी दोघांनी मॅटर्निटी फोटोशूट करून ट्रोलर्सची तोंड बंद केली.

हेही वाचा – Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो

त्यानंतर डिलिव्हरीला जाण्याआधी दीपिका आणि रणवीरने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी दोघं आपापल्या कुटुंबियांबरोबर पाहायला मिळाले. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका आणि रणवीरच्या घरी पाळणा हलला आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती अलीकडेच नाग अश्विनच्या ‘कल्कि 2898 एडी ‘चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात दीपिका प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्याबरोबर पाहायला मिळाली होती. आता दीपिका लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासह पती रणवीर सिंग, अजय देवगण, करिना कपूर, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफसह तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.

Story img Loader