Deepika Padukone Ranveer Singh Net Worth: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. ६ जुलै १९८५ रोजी मुंबईत जन्मलेला रणवीर बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. लोकप्रियता व संपत्ती दोन्हीच्या बाबतीत रणवीर आघाडीवर आहे. रणवीरची पत्नी व बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणही कमी नाही. दोघेही कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत. या जोडप्याची एकूण संपत्ती ७४५ कोटी रुपये आहे. या दोघांपैकी श्रीमंत कोण आहे ते जाणून घेऊयात.

रणवीर सिंहने बॉलीवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अभिनेता म्हणून केलेला रणवीरचा पदार्पणाचा चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी अभिनेत्याने कंटेंट रायटर म्हणूनही काम केलं होतं. अगदी शून्यातून सुरूवात करणारा रणवीर सिंह आता चित्रपटांसाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतो. तो इंडस्ट्रीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंह एका चित्रपटासाठी ३० ते ४० कोटी रुपये घेतो. तो मागच्या १४ वर्षांपासून चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.

Aditya Sarpotdar
मराठी चित्रपटांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे? ‘मुंज्या’चा मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “वाईट सिनेमांचे…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Subhash Ghai
प्रसिद्ध दिग्दर्शकाने विकलं मुंबईतील घर; ८.७२ कोटीला घेतलेलं, आता मिळाले ‘इतके’ कोटी
Laxmichya Paulanni Fame Akshar Kothari's New Car
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेत्याने खरेदी केली आलिशान गाडी! किंमत माहितीये का? व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव
Mamta Kulkarni net worth
५२ व्या वर्षी संन्यास घेणाऱ्या मराठमोळ्या ममता कुलकर्णीची संपत्ती किती? वाचा…
Groww app ipo marathi news
शेअर बाजारातील ‘या’ ट्रेडिंग ॲपचा मेगा आयपीओ येतोय
first class Dabhade team surprised audience with Rs 112 tickets on its release day
पहिल्याच दिवशी ११२ रुपयांत तिकीट; ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाची प्रेक्षकांसाठी खास ऑफर
Akshay Kumar sells apartment in Mumbai
अक्षय कुमारने २.३८ कोटींचे अपार्टमेंट विकले तब्बल ‘इतक्या’ कोटीत, अभिनेता झाला मालामाल

‘इगो’मुळे जूही चावलाने माधुरी दीक्षितबरोबर ‘तो’ सुपरहिट सिनेमा नाकारलेला; कबुली देत म्हणाली, “नेहमीच आमची…”

रणवीर सिंहची संपत्ती किती?

रणवीर सिंह त्याच्या दमदार अभिनयाइतकाच फॅशनसाठीही खूप लोकप्रिय आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तो जाहिरातींमधूनही चांगली कमाई करतो. रणवीर पेप्सी, चिंग्स, मन्यावर, बिंगो आणि हेड अँड शोल्डर्स सारख्या ब्रँड्सच्या जाहिरातींमधून मोठी कमाई करतो. रणवीरचे मुंबईतील वांद्रेमध्ये सी-फेसिंग अपार्टमेंट देखील आहे. हे शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याजवळ आहे आणि या अपार्टमेंटची किंमत ११९ कोटी रुपये आहे. रणवीर सिंहची एकूण संपत्ती २४५ कोटी रुपये आहे.

Video: ५६ वर्षांपूर्वीच्या आयकॉनिक गाण्यावर मुकेश व नीता अंबानींचा रोमँटिक अंदाज; नातवंडांसह व्हिंटेज कारमधून केली सफर

रणवीरपेक्षा जास्त आहे दीपिका पादुकोणची संपत्ती

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ही इंडस्ट्रीतील सर्वात आघाडीची आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. खासकरून २०२३ हे वर्ष तिच्यासाठी खूप चांगलं राहिलं. तिच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. आता तिचा ‘कल्कि 2898 एडी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. याशिवाय ती ‘सिंघम अगेन’ आणि ‘ब्रह्मास्त्र २’ सारख्या या बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दीपिका गरोदर असून आता ती या टप्प्याचा आनंद घेत आहे. दीपिकाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास तिने चित्रपटांव्यतिरिक्त अनेक स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे आणि त्यातून ती प्रचंड पैसा कमावते.

Video: अमृता फडणवीस अन् लेक दिविजा सारखाच लूक करून पोहोचल्या अनंत-राधिकाच्या संगीतला, ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पादुकोण एका महिन्यात तीन कोटी रुपये कमावते. या हिशोबाने ती एका वर्षात जवळपास ४० कोटी रुपये कमावते. तिच्या नेट वर्थबद्दल बोलायचं झाल्यास तिची संपत्ती पती रणवीर सिंहपेक्षा दुप्पट आहे. दीपिकाची एकूण संपत्ती ५०० कोटींच्या जवळपास आहे. ती एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी अभिनेत्री तब्बल आठ कोटी रुपये घेते.

Story img Loader