Deepika And Ranveer New House : बॉलीवू़ड कलाकारांची लोकप्रियता पाहता, त्यांच्या एखाद्या नव्या चित्रपटाबाबत किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. बॉलीवूडमधील अशीच लोकप्रिय जोडी म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह. ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ व ‘रामलीला’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांतून या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. दीपिका आणि रणवीर या दोघांचाही फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात आहे. अशातच आता दीपिका आणि रणवीर त्यांच्या नव्या घराच्या निमित्तानं पुन्हा चर्चेत आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इतक्या’ कोटींचं आहे नवं घर

दीपिका आणि रणवीर यांच्या नव्या घराच्या बातमीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या दोघांनी मुंबईत चार मजल्यांचं घर खरेदी केलं होतं. सध्या त्या घराचं बांधकाम पूर्ण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड हा मुंबईतील सर्वांत महागडा परिसर म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी सुपरस्टार शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला आहे. दीपिका आणि रणवीर यांनी खरेदी केलेलं नवं घर शाहरुखच्या बंगल्यापासून काही अंतरावरच आहे. या घराची किंमत १०० कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या हे दोघं ही बाळाच्या स्वागतासाठी सिनेविश्वापासून लांब आहेत. या सप्टेंबर महिन्यात त्यांचं हे नवं घर सज्ज असणार आहे. त्याचबरोबर रायगडमध्येदेखील त्यांनी बंगला खरेदी केल्याचं म्हटलं आहे. दी इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, अलिबागमध्ये या दोघांनी दोन वर्षांपूर्वीच २२ कोटींचा बंगला खरेदी केला होता.

हेही वाचा- ‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटासह गाजलेले हिंदी सिनेमे पुन्हा थिएटर्समध्ये होणार प्रदर्शित, वाचा यादी

‘अशी’ आहे नव्या घराची रचना


दीपिका आणि रणवीर यांनी एका प्रशस्त अपार्टमेंटचे १६ ते १९ असे चार मजले विकत घेतले आहेत. घराच्या आतील भागाचे एकूण क्षेत्रफळ ११,२६२ चौरस मीटर इतके आहे. त्याचबरोबर १३०० चौरस मीटर फुटांची जागा गच्चीसाठी वापरण्यात आली आहे. ‘विरल भयाणी’ या पापाराझी अकाउंटवरून दीपिका आणि रणवीरच्या नव्या घराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यात असल्याचं दिसून येत आहे. ‘दीपिका आणि रणवीर यांचं हे नवीन घर आहे’, असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या दोघांनी एकत्र येत वांद्र्यामधील सर्वांत महागडा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅण्डस्टॅण्ड परिसरात घर घेतल्यानं चाहत्यांनी त्यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

हेही वाचा – “माझे पती देखणे अन् रोमँटिक आहेत, त्यामुळे…”; नर्गिस यांना स्पष्टच बोलल्या होत्या राज कपूर यांच्या पत्नी

अनेकदा मुलाखतींतून दीपिकानं सांगितलं होतं की, तिला समुद्र प्रचंड आवडतो. ही अपार्टमेंट समुद्रालगत असल्यानं बाहेरील दिसणारं दृष्य विहंगम आहे. दीपिकाबद्दल सांगायचं तर नुकत्याच आलेल्या ‘कल्की’ चित्रपटात तिची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या सिमेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. गर्भवती असूनदेखील तिनं हा चित्रपट केला. त्यामुळे चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone and ranveer singh new house will done next few day this video viral on social media tsg