काही महिन्यांपूर्वी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दीपिका पादुकोण ( Deepika Padukone ) आणि रणवीर सिंहच्या घरी पाळणा हलला. दोघं पहिल्यांदाच आई-बाबा झाले. ८ सप्टेंबर २०२४ रोजी दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियाद्वारे दिली होती. आज दीपिकाच्या लेकीला दोन महिने पूर्ण झाले आहेत आणि आजच पहिल्यांदा लेकीबरोबर दीपिका आणि रणवीर दिसले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री दीपिका पादुकोणने ( Deepika Padukone ) काही दिवसांपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या लेकीच्या नावाचा खुलासा केला होता. तिने पहिल्यांदाच मुलीचा फोटो शेअर करत तिच्या नावासह अर्थ सांगितला होता. दीपिकाने तिच्या चिमुकल्या मुलीच्या पायाचा फोटो शेअर करून ‘दुआ’ नाव ठेवल्याचं जाहीर केलं होतं. “Dua Padukone Singh | दुआ पादुकोण सिंह…‘दुआ’: म्हणजे प्रार्थना…कारण ती आमच्या प्रार्थनांचे उत्तर आहे…आमची मनं प्रेम आणि कृतज्ञतेने भरली आहेत…दीपिका आणि रणवीर”, असं दीपिकाने पोस्टमध्ये लिहिलं होतं. त्यानंतर आज दीपिका आणि रणवीर पहिल्यांदाच लेकीबरोबर दिसले आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18: एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली, “तुला लाँच केल्यानंतर मी…”

आपल्या लाडक्या लेकीबरोबर दीपिका आणि रणवीर मुंबई एअरपोर्ट दिसले. याचे व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर्सने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये दीपिका आपल्या लाडक्या लेकीला कुशीत घेऊन जाताना दिसली. यावेळी रणवीरने दुआबरोबर ट्विनिंग केल्याचं दिसलं. दोघांनी फिकट गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले होते. पहिल्यांदाच दीपिका ( Deepika Padukone ) आणि रणवीर आपल्या लाडक्या लेकीबरोबर दिसले. त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

दीपिका पादुकोण

हेही वाचा – “अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, होणारा नवरा अंबर गणपुळे कमेंट करत म्हणाला…

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’नंतर ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर केलं अधिराज्य

दरम्यान, दीपिका पादुकोण ( Deepika Padukone ) आणि रणवीर सिंहच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, दोघांसाठी हे वर्ष खूप खास आहे. कारण सुपरहिट चित्रपटांबरोबर त्यांच्या आयुष्यात लक्ष्मी आली आहे. यामुळे दोघांचा आनंद द्विगुणित झाला आहे. सध्या दोघांचा ‘सिंघम अगेन’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात दोघं पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकले आहेत. याशिवाय दोघं ‘ब्रह्मास्त्र 2- देव’ चित्रपटात एकत्र पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone and ranveer singh spotted with baby dua after delivery video viral pps