६ मे रोजी न्यूयॉर्क येथे मेट गाला पार पडला जिथे आलिया भट्ट, ईशा अंबानीसह इतर अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. परंतु यावर्षी अभिनेत्री दीपिका पदुकोण या फॅशन इवेंटमध्ये हजर राहू शकली नाही. लवकरच आई होणारी दीपिका तिचा क्वालिटी टाईम रणवीरसह आणि होणाऱ्या बाळासह घालवण्यात व्यग्र असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

दीपिका पदुकोण, रणवीर सिंगचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या फोटोत दीपिका आणि रणवीर एका जहाजातून उतरताना दिसतायत. दीपिकाने या फोटोत लूज टीशर्ट ड्रेस आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केलीय तर रणवीर सिंगने ऑल व्हाईट लूकची निवड केली आहे. या फोटोमध्ये दीपिकाचं बेबी बंप दिसतंय असं चाहते म्हणतायत.

kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली
Farhan Akhtar Shibani Dandekar pregnancy
फरहान अख्तर ५१ व्या वर्षी तिसऱ्यांदा बाबा होणार? मराठमोळी सून गरोदर असल्याच्या चर्चांवर सावत्र सासूबाई शबाना आझमी म्हणाल्या…

हेही वाचा… वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीला संपवावंसं वाटलं होतं त्याचं आयुष्य; म्हणाला,“मी एका रात्री टेरेसवर…”

रणवीर आणि दीपिकाचा हा अनसीन फोटो रेडीटवर व्हायरल होतोय. या व्हायरल फोटोवर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स आल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “दीपिकाचा बेबी बंप दिसत आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “देव या जोडप्याला आशीर्वाद देवो.”

यापूर्वी दीपिका आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’च्या सेटवर ॲक्शन सीक्वेन्सचं शूटिंग करण्यासाठी आली होती. त्यावेळेस अभिनेत्रीचे पोलिसांच्या गणवेशातले फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका आणि रणवीर आई-बाबा होणार आहेत. २९ फेब्रुवारीला याबाबत दीपिका-रणवीरने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली होती. या कपलने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ‘सप्टेंबर २०२४’ असे लिहिले होते आणि त्याच्या खाली तिचे व रणवीरचे नाव लिहिले होते. तसेच या पोस्टमध्ये लहान बाळाचे कपडे व खेळण्यांचे चित्रही रेखाटले होते.

हेही वाचा… “…तुम्ही हुमा कुरेशीच्या पाया पडत होता”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्याची कमेंट; अभिनेता म्हणाला, “मला भरून आलं…”

दरम्यान, दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर दीपिका नुकतीच ‘फायटर’मध्ये झळकली होती. ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटातदेखील दीपिका दिसणार आहे. १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिकाचा ‘कल्कि २८९८ एडी’ हा चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिकासह प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दिशा पटानी अशा कलाकारांबरोबर दिसणार आहे. lतर रणबीर कपूर ‘डॉन-३’ या चित्रपटात कियारा अडवाणीबरोबर झळकणार आहे.

Story img Loader