दीपिका पदुकोण ही बॉलिवूडची सर्वात प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री मानली जाते. दीपिका केवळ भारतातच नाही तर परदेशातही खूप लोकप्रिय आहे. ‘ओम शांती ओम’ मधून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या दीपिकाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दीपिकाने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आता तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळेच दीपिका पदुकोणचा जगातील टॉप १० सुंदर महिलांच्या यादीत समावेश झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : रणवीर सिंगला ४ कोटींची गाडी चालवणं पडलं महागात; मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

नुकतीच एका शास्त्रज्ञाने ही जाहीर केली आहे. त्याने जगातील सर्वात सुंदर महिलांच्या सौंदर्य मोजण्यासाठी एका प्राचीन ग्रीक तंत्राचा वापर केला. त्यासोबत त्याचे कॉम्युटरवर मॅपिंग केले आणि निष्कर्ष काढला. या पद्धतीला ‘गोल्डन रेशो ऑफ ब्युटी’ असेही म्हणतात. त्याच्या तंत्रानुसार जोडी कॉमर हिला जगातील सर्वात सुंदर महिला घोषित करण्यात आले आहे. त्याचबरोबर बियॉन्से आणि किम कार्दशियन यांनीही टॉप १० मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही जगातील १० सर्वात सुंदर महिलांच्या यादीत समावेश झालेली एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली आहे. या यादीत दीपिका नवव्या क्रमांकावर आहे. तिला ९१.२२ गुण मिळाले आहेत.

प्राचीन ग्रीकच्या मते, एखाद्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावरील विशिष्ट गुणोत्तरानुसार सौंदर्य मोजले जाऊ शकते. या यादीत झेंडाया, बेला हदीद, बियॉन्से, एरियाना ग्रांडे, टेलर स्विफ्ट, जॉर्डिन डन, किम कार्दशियन, दीपिका पदुकोण आणि होयॉन जंग या १० महिलांनी स्थान पटकावले आहे.

हेही वाचा : ‘ब्रह्मास्त्र’च्या यशानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागावरून नवा वाद सुरू; नेमकं कारण काय?

दरम्यान दीपिका लवकरच शाहरुख खान बरोबर ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याबरोबरच दीपिका ही रणबीर कपूरच्या ‘बह्मास्र’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही झळकणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone becames the only indian woman in top 10 most beautiful women list rnv