बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणचा आज वाढदिवस आहे. अभिनय कौशल्य व घायाळ करणाऱ्या मादक अदांनी दीपिकाने प्रेक्षकांची मनं जिंकली. दीपिकाने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगशी १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. २०२२मध्ये अनेक अभिनेत्रींच्या घरी पाळणा हलला. आता २०२३मध्ये दीपिका गुडन्यूज देणार का? याबाबत चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आईबाबा होण्याबाबत दीपिकाने एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं होतं. “मला आणि रणवीरला लहान मुलं खूप आवडतात. आम्हाला आईबाबाही व्हायचं आहे. पण, याबाबत आम्ही अजून विचार केलेला नाही. माझ्या आईवडिलांबरोबर माझं बालपण आनंदी व सुरक्षित होतं. तसंच मलाही माझ्या मुलांना द्यायचं आहे”, असं दीपिकाने सांगितलं होतं.

हेही वाचा>>Video: नवरा असावा तर असा! रितेश देशमुखने जिनिलीयासाठी घेतला खास उखाणा

हेही वाचा>>आर्यन खान करतोय नोरा फतेहीला डेट? दुबईतील व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, ज्योतिषांनी यंदाच्या वर्षी दीपिका व रणवीर आईबाबा होणार असल्याचं भविष्य वर्तविलं आहे. त्यामुळे दीपिका व रणवीरचे चाहतेही आतुर आहेत.

हेही वाचा>> “आयुष्य संपवून टाकावं असं वाटतं, पण…”, गौरव मोरेने शेअर केला चाहत्याचा ‘तो’ मेसेज

दीपिका सध्या तिच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे दीपिकालाही ट्रोल केलं जात आहे. भगवी बिकिनी परिधान करुन रोमान्स केल्यामुळे दीपिकाचं हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. दीपिका व शाहरुख मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone birthday special is ranveer singh and she become parents this year actress shared thoughts of parenhood kak