बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांची जोडीला प्रेक्षकांनी ऑनस्क्रीन किंवा ऑफस्क्रीन चांगली पसंती दिली. ‘दीपवीर’चे चाहते त्यांना एकत्र बघण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. नुकतंच दीपिका आणि रणवीर लवकरच वेगळे होणार आहेत, असे वृत्त समोर आले होते. हे वृत्त ऐकून अनेकांना धक्का बसला होता. काही दिवसांपूर्वी रणवीरने याबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर आता दीपिका पदुकोणने यावर मौन सोडले आहे.
दीपिका पदुकोणने नुकतंच ब्रिटनचा राजकुमार प्रिन्स हॅरी यांची पत्नी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांनी एक पॉडकॉस्ट रेकॉर्ड केले आहे. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या माहितीनुसार, “या पॉडकॉस्टमध्ये दीपिका पदुकोणने रणवीर सिंगबद्दलही भाष्य केले. यावेळी ती म्हणाली, “मी आणि रणवीर बराच काळ कामामुळे घरापासून दूर होतो. गेल्या आठवडाभरापासून तो एका म्यूजिक कॉन्सर्टमध्ये व्यस्त होता. पण आता तो नुकतंच परतला आहे. माझ्या चेहरा पाहून त्याला नक्कीच आनंद द्विगुणित होईल.”
आणखी वाचा : “मी सलग ११-१२ तास…” घश्याचा कर्करोगाच्या चर्चांवर दिशा वकानीने दिलेलं स्पष्टीकरण
काही दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिकाबद्दल अनेक बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असा दावाही एकाने केला होता. त्यानंतर रणवीरने या बातम्या केवळ अफवा होत्या, असे सांगितले होते. ज्यामुळे या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
या व्हिडीओमध्ये रणवीर म्हणाला, “देवाची कृपा आहे… आम्ही दोघं एकमेकांना भेटलो आणि २०१२ मध्ये डेट करायला सुरुवात केली आज दहा वर्षांनंतर २०२२ पर्यंत आम्ही एकमेकांना डेट करत आहोत.”
आणखी वाचा : “मला अमिताभ बच्चन व्हायचे आहे” अभिनेता रणवीर सिंगचे वक्तव्य
दरम्यान दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचं लग्न २०१८ मध्ये झालं होतं. त्याआधी जवळपास ६ वर्षं ते दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. दीपिका पदुकोण ही लवकरच शाहरुख खानसह ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती हृतिकसह ‘फायटर’मध्येही दिसणार आहे. तर रणवीर हा लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे.