बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानने त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत याने वेगवेगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. शाहरुखच्या चाहत्यांनी आणि एकूणच चित्रपट रसिकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. प्रदर्शनाआधी हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला, पण त्यामुळे चित्रपटाचं फारसं नुकसान झालं नाही.

चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणची केमिस्ट्री लोकांना चांगलीच पसंत पडली. दीपिकावर चित्रित झालेल्या ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता, पण यातील या दोघांची केमिस्ट्री लोकांना भावली. आता पुन्हा हीच जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. लवकरच शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण पुन्हा एका अशाच गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत.

ROHIT Pawar
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर…”
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”

आणखी वाचा : ‘पठाण’चं कलेक्शन १००० कोटींहून अधिक; YRF आणि शाहरुख खान यांच्या हाती लागले ‘इतके’ कोटी, जाणून घ्या

‘ईटाइम्स’च्या वृत्तानुसार शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ चित्रपटात दीपिका पदूकोणचाही एक कॅमिओ पाहायला मिळणार आहे. नुकतंच दीपिका आणि शाहरुखने यातील एका गाण्यासाठी चित्रीकरण केलं आहे, त्यादरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांनी पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि मॅचिंग शूज परिधान केले आहेत.

सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाच्या सेटवरचे बरेच फोटो बाहेर येत आहेत. मध्यंतरी फराह खानबरोबरही एका गाण्याच्या चित्रीकरणाचे फोटो समोर आले होते. अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ जूनमध्ये प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये शाहरुख खानबरोबरच विजय सेतुपती, नयनतारा, सुनील ग्रोव्हर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader