बॉलिवूडची सर्वात हिट जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाला आज ४ वर्षे झाली आहेत. १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये या दोघांनी इटलीच्या लेक कोमो येथे लग्न केलं होतं. दीपिका आणि रणवीर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खुश असल्याचं दिसून येतं. दरम्यान काही काळापूर्वी हे दोघंही घटस्फोट घेणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या सगळ्या अफवा असल्याचं या जोडीने सिद्ध केलं. आज हे दोघंही लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करत आहेत. पण डेटिंग सुरुवात केल्यानंतर दीपिकाने ती रणवीर सिंगला कधीही सोडून जाऊ शकते हे स्पष्ट केलं होतं.

रणवीर आणि दीपिकाने एकमेकांना २०१२ मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. पण त्या नात्याबाबत दीपिकाला खात्री नव्हती. तिला सुरुवातीलाच या नात्यात रणवीर सिंगला कोणतीही कमिटमेंट द्यायची नव्हती. कारण त्याआधी तिचं काही वेळा ब्रेकअप झालं होतं. अशात तिला कोणावरही विश्वास ठेवणं कठीण होतं. एका मुलाखतीत दीपिकाने याचा खुलासा केला होता.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
Suresh Dhas on Dhananjay Munde
Suresh Dhas : “मी धनंजय मुंडेंचा राजीनामा….”, अजित पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले सुरेश धस?
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल
Govinda and wife Sunita Ahuja live separately
गोविंदा व त्याची पत्नी राहतात वेगळे, सुनीता आहुजा पतीबद्दल म्हणाली, “त्याच्याकडे अफेअर्ससाठी वेळ…”

आणखी वाचा- “मी फक्त मलायकाचा पती म्हणून…” अरबाज खानने व्यक्त केलं दुःख

लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका म्हणाली, “जेव्हा मी रणवीरला डेट करायला सुरुवात केली तेव्हा मी मला ओपन रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. कारण त्याआधी नात्यांमध्ये माझा विश्वासघात झाला होता. मी कोणत्याही नात्यात माझे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करते. मग ते नातं १ वर्षाचं असो वा ३ किंवा ५ वर्षांचं मी नेहमीच माझ्या पार्टनरशी प्रामाणिक राहिले आहे. अशात जेव्हा रणवीरने मला प्रपोज केलं तेव्हा मी त्याला म्हणाले होते की मी त्याला कोणतीही कमिटमेंट करणार नाही.”

आणखी वाचा-…तरीही सर्वांसमोर एकमेकांना किस करत राहिले रणवीर- दीपिका!

दीपिका पुढे म्हणाली, “मी रणवीरला सांगितलं होतं की हे ओपन रिलेशनशिप असेल, मी तुला कोणतंही वचन देणार नाही. आज मला तुझ्याबद्दल फिलिंग आहेत पण जर मला काही दिवसांनी किंवा महिन्यांनी असं वाटलं की मला दुसरी कोणतीही व्यक्ती जास्त जवळची वाटतेय. त्याचा सहवास आवडतोय तर मग मी तुला सोडून देईन आणि माझ्या आयुष्यात पुढे जाईन. विशेष म्हणजे त्याने हे मान्य केलं.”

दरम्यान एका मुलाखतीत रणवीर सिंगनेही हा किस्सा सांगितला होता. याबद्दल बोलताना रणवीर म्हणाला, “तिने तिच्या भावना व्यक्त करतानाच ओपन रिलेशनशिपबद्दल सांगितलं होतं. ती त्यावेळी एका वेगळ्या परिस्थितीतून जात होती. त्यामुळे मी तिचं म्हणणं मान्य केलं. पण त्यावेळी मी पण ठरवलं होतं की, दीपिकाला दुसरं कोणी आवडेल अशी वेळ मी येऊच देणार नाही आणि अखेर घडलंही असंच. आता आमचं लग्न झालंय मी खूप खुश आहे.”

Story img Loader