संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट १८ डिसेंबर २०१५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक वेदळीच जादू केली होती. ‘बाजीराव मस्तानी’च्या निमित्ताने रणवीर-दीपिकाचं नातं सुद्धा खऱ्या अर्थाने घट्ट झालं. या चित्रपटासाठी दीपिकाला बहुतांश पुरस्कार मिळाले होते. आता जवळपास ८ वर्षांनी पुन्हा एकदा ‘मस्तानी’च्या भूमिकेमुळे तिला एक मोठी संधी मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपिका ‘बाजीराव मस्तानी’मध्ये “दीवानी मस्तानी…” या आयकॉनिक गाण्यावर थिरकली होती. याच गाण्यामुळे अभिनेत्रीला चक्क ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ म्हणजेच ऑस्करच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर झळकण्याची संधी मिळाली आहे. ऑस्करने दीपिकाच्या “दीवानी मस्तानी…” या डान्सची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. हे गाणं प्रसिद्ध बॉलीवूड गायिका श्रेया घोषाल हिने गायलं आहे.

हेही वाचा : “नाटकाला अर्ध्या तिकिटात प्रवेश मिळेल का?”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला प्रशांत दामलेंनी दिलं मजेशीर उत्तर, म्हणाले…

“दीपिका पुदकोण ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील “दीवानी मस्तानी…” या गाण्यावर परफॉर्म करत असून श्रेया घोषालने हे गाणं गायलं आहे.”, असं कॅप्शन देत ऑस्करने अभिनेत्रीचा हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. दीपिकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रिशेअर देखील केला आहे.

ऑस्करने शेअर केलेल्या व्हिडीओवर तिचा पती व बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहने खास कमेंट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “मेस्मेरिक…” असं त्याने हा व्हिडीओ पाहून म्हटलं आहे. यामध्ये दीपिकाने मस्तानी, तर रणवीरने बाजीराव पेशवे यांची भूमिका साकारली होती.

हेही वाचा : “मी खरेदी केलेली संपत्ती माझ्याच नावावर”, शर्मिला टागोर यांची माहिती; म्हणाल्या, “इस्लाममध्ये मृत्यूपत्र करण्याची…”

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : सायली-अर्जुनच्या जाळ्यात प्रिया अडकेल का? दोघांनी बनवली खास योजना, विशेष भागाचा प्रोमो आला समोर

दरम्यान, दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ती रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ आणि प्रभासबरोबर एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री लवकरच आई होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone dancing on deewani mastani gets featured on oscars official ranveer singh reacts sva 00