अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. लवकरच आई होणारी अभिनेत्री दीपिका तिच्या कुटुंबीयांबरोबर क्वालिटी टाईम घालवताना दिसतेय. शुक्रवारी रात्री अभिनेत्री डिनरसाठी मुंबईमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती.

‘एलए लोका मारिया'(LA Loca Maria) या रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दीपिका पापाराझींना दिसली. दरम्यान, पापाराझींनी तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ काढले, जे सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल होत आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ

हेही वाचा… ठरलं! ‘बिग बॉस ओटीटी-३’च्या होस्टची जबाबदारी अनिल कपूरकडे; शोचा नवा प्रोमो आला समोर

कुटुंबाबरोबर डिनर डेटसाठी गेलेल्या दीपिकाने काळ्या रंगाचा स्लीट ड्रेस आणि त्यावर डेनिम जॅकेट परिधान केलं होतं. मॅचिंग पर्स, मिनिमल मेकअप, ज्वेलरी आणि खुले केस यामध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अगदी खुलून दिसत होतं. दीपिकाची आई उज्ज्वला पदुकोणदेखील दीपिकाबरोबर दिसली. अभिनेत्रीच्या आईने रोझ गोल्ड सॅटिन शर्ट आणि ब्लॅक ट्राउजर परिधान केली होती.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दीपिकाचा बेबी बंपही दिसत होता. दीपिकाच्या प्रेग्नेन्सीची गुड न्यूज मिळाल्यापासून तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दीपिकाच्या चाहत्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “दीपिकाच्या प्रग्नेन्सीचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर दिसतोय. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “रणवीर कुठे आहे.” एका युजरने कमेंट करत विचारलं, “रणवीर सिंग त्याच्या प्रग्नेन्ट पत्नीबरोबर का दिसत नाहीय?” तर एकाने कमेंट करत लिहिलं, “दीपिका खरंच खूप सुंदर दिसतेय.”

हेही वाचा… ठरलं तर मग: व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार सुरू अन् मिळणार साक्षीविरोधात नवा पुरावा; चैतन्य खेळणार नवी खेळी, पाहा प्रोमो

दीपिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, दीपिकाने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी रणवीर सिंगबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका आणि रणवीर आई-बाबा होणार आहेत. २९ फेब्रुवारीला याबाबत दीपिका-रणवीरने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली होती. या कपलने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ‘सप्टेंबर २०२४’ असे लिहिले होते आणि त्याच्या खाली तिचे व रणवीरचे नाव लिहिले होते. तसेच या पोस्टमध्ये लहान बाळाचे कपडे व खेळण्यांचे चित्रही रेखाटले होते.

हेही वाचा… अर्जुन कपूरशी ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका अरोराने सोडलं मौन; म्हणाली, “नाही, या सगळ्या…”

दरम्यान, दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर दीपिका नुकतीच ‘फायटर’मध्ये झळकली होती. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटातदेखील दीपिका दिसणार आहे.

Story img Loader