दीपिका पदुकोण व रणवीर सिंग बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडपं आहे. या दोघांकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. मात्र आता एका व्हायरल व्हिडीओमुळे दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान एका कार्यक्रमामधील हा व्हिडीओ होता. दीपिका-रणवीरसह तिचे वडील प्रकाश पादुकोणही या कार्यक्रमात हजर होते. दीपिका व रणवीरच्या नात्याची चर्चा सुरू असताना प्रकाश पादुकोण यांच्याबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.
दीपिका व रणवीर यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असल्याचं नेटकरी सातत्याने म्हणत आहेत. पण यादरम्यान दीपिकाच्या वडिलांच्या वैवाहिक आयुष्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रकाश यांनी त्यांच्या लग्नाबाबत एक धक्कादायक खुलासा केला. ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आणखी वाचा – Video : निक जोनसवर चाहतीनं फेकलं अंतर्वस्त्र, प्रियांका चोप्रानं असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल
दीपिकाच्या वडिलांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, “मला आठवत की, मी राष्ट्रीय स्पर्धा खेळलो होतो. नऊ वर्षांमध्ये त्यावेळी ही स्पर्धा मी पहिल्यांदा हारलो. त्यावेळी मला खूप दुःख झालं होतं. या प्रसंगानंतर मी लग्नबंधनात अडकलो”.
“मी माझीच चुलत बहीण उज्जलाबरोबर लग्न केलं. लग्नानंतर आम्ही कोपेनहेगनला गेलो. कारण तिथेच मला नोकरीही मिळाली होती. १९८६म्हणजेच दीपिकाचा जन्म होईपर्यंत आम्ही तिथेच राहिलो. १९८९मध्ये माझी सेवानिवृत्ती झाली”. दीपिकाच्या वडिलांनी केलेल्या या खुलासानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. दीपिकाचे वडील हे भारतातील नावाजलेले बॅडमिंटनपट्टू आहेत.