दीपिका पदुकोण व शाहरुख खान यांचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवाय मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात ‘बेशरम रंग’ गाण्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगावरुन आक्षेप घेतला. एकीकडे दीपिकाने या गाण्यामध्ये घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे, तर दुसरीकडे काहीजण या गाण्याचं समर्थन करताना दिसत आहेत.

दीपिका पदुकोण हिचा एक लेटेस्ट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. नुकतीच ती फिफा वर्ल्डकप फायनलसाठी कतारला रवाना झाली. विमानतळावर तिला पाहण्यात आलं. ती कतारला रवाना होतानाचा विमानतळाबाहेरचा हा व्हिडीओ आहे. यावेळी एका मीडिया फोटोग्राफरने तिचं नवीन गाणं आवडलं असं तिला सांगितलं. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

आणखी वाचा : चर्चा रणवीर सिंगच्या दिलदारपणाची! स्पर्धकाच्या आवाजावर फिदा झालेल्या अभिनेत्याने त्याला दिली ‘ही’ मौल्यवान भेट

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत दीपिका विमानतळाच्या बाहेर चालताना दिसतेय. तिच्या एअरपोर्ट लूकवर, तिच्या स्टाईलवर अनेकांनी तिचं कौतुक केलं. तेवढ्यात एक मीडिया फोटोग्राफर तिला म्हणतो, “मॅम तुमचं नवीन गाणं छान आहे…आवडलं.” त्यावर दीपिका पदुकोण स्मितहास्य देते आणि म्हणते, “धन्यवाद.” पण या गाण्याण्याबद्दल इतर कुठलंही वक्तव्य त्यावेळी तिने केलं नाही. त्या मीडिया फोटोग्राफरला धन्यवाद म्हणून ती तिथून निघून गेली.

हेही वाचा : वादात सापडलेल्या ‘पठाण’ चित्रपटासाठी शाहरुख, दीपिका आणि जॉन यांनी आकारलेले मानधन माहितेय का? आकडा ऐकून व्हाल थक्क

दरम्यान ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेल्या या वादावर यशराज फिल्मकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. ‘पठाण’ हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबरच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader