95th Academy Awards 2023 : चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आहे. यंदाचा ऑस्कर भारतासाठी फारच खास होता. ऑस्कर २०२३ साठी आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळालं होतं. हा पुरस्कार आरआरआरने आपल्या नावावर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संगीतकार एमएम किरावानी आणि चंद्रबोस यांनी मंचावर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. ‘नाटू नाटू’चा पुरस्कार स्वीकारताना किरावानी म्हणाले, ‘मी कारपेंटर्सची गाणी ऐकत मोठा झालो आणि आज माझ्या हातात ऑस्कर पुरस्कार आहे’ . किरवानी यांचं स्टोजवर स्पीच सुरू असताना दीपिका पदुकोण भावूक झाली होती.

हेही वाचा>> Oscars Awards 2023 : ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळवून देणारे एम एम कीरावनी कोण आहेत?

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील दीपिका पदुकोणचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिकाचे डोळे पाणावलेले दिसत आहेत. ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर दीपिका भावूक झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. दीपिकाच्या ऑस्करमधील व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> Oscars Awards 2023 : दीपिका पदुकोणचा ऑस्करसाठी ग्लॅमरस लूक, मानेवरील टॅटूने वेधलं लक्ष

हेही वाचा>> Oscars Awards 2023 : ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाला ऑस्कर, जाणून घ्या कोणत्या श्रेणीत मिळाला पुरस्कार

ऑस्करच्या बेस्ट ओरिजिनल साँगसाठी ‘अप्लॉज’ (टेल इट लाइक अ वुमन), ‘होल्ड माय हँड’ (टॉप गन मॅव्हरिक), ‘लिफ्ट मी अप’ (ब्लॅक पाथेर वाकांडा फॉरेव्हर), आणि ‘दिस इज ए लाइफ’ (एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स) या गाण्यांना नामांकन मिळालं होतं. यापैकी एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone gets emotional after rrr song natu natu got oscars 2023 video kak