अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. त्यांच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे हे दोघे नेहमी चर्चेत असतात. चाहतेही या जोडीकडे आदर्श जोडी म्हणून पाहतात, परंतु मध्यंतरी या दोघांमध्ये दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर दीपिकाने त्यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे करीत, नव्या पिढीतील जोडप्यांना लग्न आणि लव्ह लाइफसाठी खास सल्ला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : ‘द केरला स्टोरी’बाबत शत्रुघ्न सिन्हांची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाले, “तर बंदी घालणे…”

अलीकडच्या जोडप्यांबाबत बोलताना दीपिका म्हणाली, “आपल्या आयुष्यात चित्रपटांमुळे खूप प्रभाव पडतो किंवा सभोवतालच्या लोकांचे नातेसंबंध आणि विवाह पाहून आपण मोठे होतो. तुम्हाला कदाचित असे वाटेल की, मी एखाद्या लव्हगुरूप्रमाणे बोलत आहे, पण नव्या पिढीत संयमाचा अभाव आहे, असे मला प्रकर्षाने जाणवते. रणवीर आणि मला केवळ आमच्या आई-बाबांकडून नाही तर आमच्यासारख्या इतर जोडप्यांकडूनही खूप काही शिकता येईल. नव्या पिढीने जुन्या पिढीतील लोकांकडून नाते कसे जपायचे हे शिकले पाहिजे, तसेच सगळ्यात आधी नातेसंबंध टिकवण्यासाठी ‘संयम’ ही गोष्ट शिकली पाहिजे, कोणत्याही गोष्टीत संयम राखणे महत्त्वाचे असते.”

हेही वाचा : ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन-२ मधून करण जोहरचा पत्ता कट? ‘या’ अभिनेत्याकडे सोपवणार सूत्रसंचालनाची धुरा

दीपिकाने या वेळी तिच्या सुट्टीचा अनुभवही सांगितला. दीपिका आणि रणवीर सिंह व्हेकेशनसाठी भूतानला गेले होते. लांबवर चालत राहणे, ट्रेक करणे, वेगवेगळ्या जागांना भेटी देणे, विविध प्रकारचे पदार्थ ट्राय करणे यात रणवीर आणि तिला आनंद मिळतो, म्हणून दोघे व्हेकेशनसाठी जात असतात. तसेच रणवीर माझ्यासोबत असतो तेव्हा मी खूप सेफ फील करते, असेही अभिनेत्रीने सांगितले.

दरम्यान, सध्या दीपिका तिच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘फायटर’ या चित्रपटांच्या कामामध्ये व्यस्त आहे. ‘पठाण’ चित्रपटात दीपिकाने शाहरुख आणि जॉनसह काम केले होते. ‘पठाण’ २०२३ मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.