अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता हृतिक रोशन हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याप्रमाणेच त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहेत. दीपिका आणि हृतिक आता लवकरच पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाची घोषणा केली होती. शूटिंगदरम्यानचे काही फोटोही त्यांनी शेअर केले होते. तेव्हापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. आता अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : “माझं काम…”, ओटीटी प्लॅटफॉर्म्सने चित्रपट खरेदीसाठी दिलेल्या नकारावर नवाजुद्दीनने सोडले मौन

दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला ‘फायटर’ हा चित्रपट भारतातील पहिला एरियल अ‍ॅक्शन चित्रपट आहे. यात या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण भारतीय वायुसेनेचे पराक्रमी पायलट सकरणार असून, अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. भारताच्या सशस्त्र दलांना मानवंदना देणारा हा चित्रपट, प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, व्हायकॉम18 स्टुडिओ आणि मारफ्लिक्स पिक्चर्स यांची निर्मिती असलेला हा आगामी अ‍ॅक्शन पॅक चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जगभर झाले असून, चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अत्याधुनिक तंत्रे आणि तंत्रज्ञानाचा सुरेख वापर करण्यात आला आहे. भारतातील सर्वात मोठे अ‍ॅक्शनपट बनवण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद, ‘फायटर’च्या निमित्ताने पाहाल्यांदाच निर्मात्याच्या खुर्चीत बसत आहेत.

हेही वाचा : दीपिका पदुकोणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, पटकावला ‘हा’ आंतरराष्ट्रीय बहुमान

‘फायटर’ चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. निर्माता आणि व्हायकॉम18 स्टुडिओचे सीओओ अजित अंधारे यांचा भारतीय मूळ असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा अ‍ॅक्शन चित्रपट तयार करून जागतिक स्तरावर प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा या चित्रपटाचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातली या चित्रपटाबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.