Deepika Padukone Joins Diljit Dosanjh Concert : अभिनेता व गायक दिलजीत दोसांझच्या ‘दिल-ल्युमिनाटी टूर २०२४’चे कॉन्सर्ट भारतासह जगभर गाजत आहेत. सध्या भारताच्या विविध शहरांत हे कॉन्सर्ट होत आहेत. प्रत्येक शहरात दिलजीतने गायनाचे सादरीकरण केल्यावर तिथे त्या कॉन्सर्टची चर्चा होते. आता दिलजीतच्या बेंगळुरूमधील कॉन्सर्टची चर्चा होत आहे. कारण- या कॉन्सर्टमध्ये बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सहभागी झाली होती. दीपिका पदुकोणला या कॉन्सर्टमध्ये पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री दीपिका पदुकोणला सप्टेंबर महिन्यात कन्यारत्न प्राप्त झाले. दीपिका तिच्या लाडक्या लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी उपस्थित होती. सध्या दीपिका आणि दिलजीत यांचे या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये दिलजीत आणि प्रेक्षक दीपिकाचे स्वागत करताना दिसत आहेत. दीपिका मंचावर आली तेव्हा प्रेक्षकांना तिने हात दाखवला, नमस्कार केला आणि त्यानंतर दिलजीतला मिठी मारत थोडा वेळ त्याच्याबरोबर तिने डान्सही केला.

हेही वाचा…घटस्फोटाच्या खटल्यामुळे जगभर राहिली चर्चेत; प्रसिद्ध अभिनेत्री लग्न न करताच दुसऱ्यांदा होणार आई

दिलजीतने दीपिकाचे केले कौतुक

एक व्हिडीओत दिलजीत दीपिकाचे कौतूक करताना दिसत आहे. तो म्हणाला, “तिनं खूप सुंदर काम केलं आहे. आपण तिला मोठ्या पडद्यावर पाहिलं आहे; पण इतक्या जवळून कधी पाहू, असं कधी वाटलं नव्हतं. स्वत:च्या मेहनतीवर तिनं बॉलीवूडमध्ये स्थान मिळवलं आहे.” दिलजीत पुढे म्हणाला, “तुम्ही खूप छान आणि सुंदर काम केलं आहे. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे. तुम्ही आमच्या शोमध्ये आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, मॅडम,” असे म्हणत दिलजीतने तिचे कौतुक केले.

दीपिकाने दिलजीतला शिकवली कन्नड भाषा

एका व्हिडीओमध्ये दीपिका दिलजीतला कन्नडमधील वाक्य शिकवताना दिसली आणि दिलजीतनेही हे वाक्य प्रेक्षकांना बोलून दाखवले. त्यानंतर दीपिका मंचावरून खाली उतरली. या शोसाठी दीपिकाने बॅगी पांढरा टी-शर्ट आणि डेनिम्स, असा वेश केला होता. दीपिकाचे या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यात ती दिलजीतचे गाणे गाताना आणि त्यावर थिरकताना दिसत आहे.

हेही वाचा…खिळवून ठेवणाऱ्या कथा आणि जबरदस्त ट्विस्ट; ‘या’ वीकेंडला नेटफ्लिक्सवर पाहता येतील चोरींवर आधारित ‘हे’ पाच सिनेमे

दीपिका नुकतीच रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने शक्ती शेट्टी ऊर्फ लेडी सिंघमची दमदार भूमिका साकारली होती. या चित्रपटात रणवीर सिंग, करीना कपूर, अर्जुन कपूर, अजय देवगण, टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

हेही वाचा…गरिबांचा रणवीर सिंह म्हणणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला, “माझ्यासाठी ट्रोलिंग…”

दिलजीत सध्या त्याच्या दिल-ल्युमिनाटी टूरमुळे जगभरात चर्चेत आहे. गेल्या महिन्यात त्याने कोलकातामध्ये दमदार परफॉर्मन्स दिला होता. २९ डिसेंबरला गुवाहाटी येथे शेवटच्या कॉन्सर्टसह तो या टूरचा समारोप करेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone joins diljit dosanjh bengaluru concert post daughter birth first public appearance psg