बॉलिवूडची सर्वात हिट जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाला आज ४ वर्षे झाली आहेत. १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये या दोघांनी इटलीच्या लेक कोमो येथे लग्न केलं होतं. दीपिका आणि रणवीर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खुश असल्याचं दिसून येतं. दरम्यान काही काळापूर्वी हे दोघंही घटस्फोट घेणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या सगळ्या अफवा असल्याचं या जोडीने सिद्ध केलं. आज हे दोघंही लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह लाइफमधील रंजक किस्सा…
एका मुलाखतीत ‘रामलीला’ चित्रपटातील क्रू मेंबरने सांगितलं होतं की, दोघंही एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडाले होते. सेटवर अनेकदा ते एकमेकांना बेबी म्हणून हाक मारायचे. जेव्हा शूटिंग सुरू नसायचं तेव्हा दोघंही एकमेकांबरोबर जेवयाचे, वॅनिटीमध्ये एकत्र तासंतास बसायचे. अनेकांना त्यावेळी वाटलं होतं की शूटिंग संपल्यानंतर दोघं हळूहळू वेगळे होतील. पण जेव्हा त्यांना ‘बाजीराव मस्तानी’साठी एकत्र कास्ट करण्यात आलं तेव्हा मात्र त्यांच्या प्रेमाची सर्वांनाच खात्री पटली.
आणखी वाचा- “रणवीर टॉयलेटमध्ये…” दीपिका पदुकोणने केला बेडरुम सिक्रेटचा खुलासा
अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची लव्हस्टोरी खूपच खास आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रामलीला’ या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसली होती. पण या चित्रपटातील ‘अंग लगा दे’ गाण्याच्या शूटिंगवेळी एक धम्माल किस्सा घडला होता. या गाण्याच्या अखेरीस रणवीर आणि दीपिकाचा एक किसिंग सीन होता आणि या गाण्याचं शूट सुरू होतं. सीन संपला तसं दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी कट म्हटलं. पण दिग्दर्शकांनी कट म्हटल्यानंतरही रणवीर- दीपिका एकमेकांना किस करत राहिले. त्यावेळी सेटवर ५० लोक उपस्थित होते. हे दोघंही एकमेकांत एवढे गुंतले होते की तिथे उपस्थित असलेले सर्वच हैराण झाले. त्याचवेळी हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात असल्याचं कन्फर्म झालं.
आणखी वाचा- …अन् रणवीर सिंगने बायकोकडे मागितलं किस, दीपिका पदुकोणच्या पोस्टवरील कमेंट चर्चेत
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी रणवीरचे सीन शूट झाल्यानंतरही तो सेटवरून जात नसे. दीपिकाचं शूटिंग संपेपर्यंत तो सेटवर थांबत असे. त्याच्यासाठी स्वतःच्या करिअरपेक्षा दीपिकाचं करिअर जास्त महत्त्वाचं होतं. दीपिकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, रणवीरनेच तिला हॉलिवूडमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. दीपिका आणि रणवीरने आतापर्यंत ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ आणि ‘८३’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.