Deepika Padukone Ranveer Singh Daughter Dua : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण मुलगी दुआ पादुकोण सिंह जवळपास चार महिन्यांची झाली आहे. आता रणवीर व दीपिकाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी दुआची पापाराझींशी ओळख करून दिली. सप्टेंबरमध्ये दुआचा जन्म झाला, त्यानंतर आता दोघेही पहिल्यांदाच जोडीने पापाराझींसाठी आयोजित इव्हेंटमध्ये दिसले.
दीपिका व रणवीर यांनी लेकीचा चेहरा अद्याप रिव्हील केलेला नाही. पण सोमवारी (२३ डिसेंबरला) दीपिका आणि रणवीर यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचा चेहरा पापाराझींना दाखवला. बॉलीवूडच्या इतर जोडप्यांप्रमाणेच या जोडप्यानेही आपल्या बाळाचे फोटो न काढण्याची विनंती पापाराझींना केली आहे.
हेही वाचा – लेकीला शिकायला अमेरिकेला पाठवल्याने अजूनही होतंय ट्रोलिंग; शरद पोंक्षे म्हणाले, “काही लोकांच्या…”
या पार्टीत दीपिका पादुकोणने बेज रंगाचा सुंदर लांब ड्रेस परिधान केला होता. तर रणवीर सिंहने पांढऱ्या रंगाचा को-ऑर्ड सेट घातला होता. या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ते हसत पोज देताना दिसतात. एका व्हिडीओमध्ये रणवीर पत्नी दीपिकाच्या गालावर किस करताना दिसला.
पाहा फोटो व व्हिडीओ –
h
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी लग्नानंतर जवळपास सहा वर्षांनी ८ सप्टेंबर रोजी त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले. त्यांनी मुलीचे नाव दुआ पादुकोण सिंह ठेवले आहे. या जोडप्याने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जामनगरला जाण्यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये गरोदरपणाची घोषणा केली. दिवाळीला दीपिकाने इन्स्टाग्रामवर लेकीचा चेहरा दिसत नसलेला एक फोटो शेअर करून तिचं नाव दुआ पादुकोण सिंह ठेवल्याची माहिती दिली.
हेही वाचा – ऐश्वर्या नारकर यांची ऑनस्क्रीन लेक अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला सोहळा, फोटो आले समोर
दीपिका व रणवीरआधी अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी अशाच एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत त्यांनी राहाचा चेहरा पापाराझींना दाखवला होता आणि लेकीचे फोटो न काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी मागील वर्षी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला राहाचा चेहरा सर्वांना दाखवला होता. आता राहाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
बॉलीवूडमधील इतर सेलिब्रिटींमध्ये अनुष्का शर्मा-विराट कोहली आणि सोनम कपूर-आनंद आहुजा यांनी पापाराझींना त्यांच्या मुलांचे फोटो न काढण्याची विनंती केली आहे. यावर्षी आई-बाबा झालेले रिचा चढ्ढा- अली फझल तसेच यामी गौतम व आदित्य धर यांनीदेखील अद्याप त्यांच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत.