अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांची जोडी बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर रणवीर-दीपिकाने २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली, तेव्हापासून दोघांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीने ‘ट्विक इंडिया’मध्ये हजेरी लावत तिच्या वैयक्तिक जीवनाबाबत काही खुलासे केले आहेत.

हेही वाचा : कार्तिक- कियाराचा ‘सत्यप्रेम प्रेम की कथा’ सिद्धार्थला मल्होत्राला आवडला की नाही? पत्नीसाठी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

दीपिका पदुकोण ‘ट्विक इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खुलासा करीत म्हणाली, “मी काही लोकांची खूप चांगली नक्कल करते. माझ्या या सवयीबाबत फारशी कोणालाही माहिती नाही. मी फक्त रणवीर आणि माझी बहीण अनिषा यांच्यासमोरच इतरांची नक्कल करू शकते. माझा नवरा रणवीर मला नेहमी सांगतो तू खूप चांगली मिमिक्री करतेस पण, माझे हे टॅलेंट आजवर कोणाच्याही समोर आलेले नाही. कारण, रणवीर-अनिषा सोडल्यास मी कोणाच्याही समोर इतरांची नक्कल करीत नाही.”

हेही वाचा : “ती माझ्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसते”; नवाजुद्दीन सिद्दीकीला पाठिंबा दिल्यावरुन कंगना राणौतवर आलिया भडकली, म्हणाली…

दरम्यान, दीपिका पदुकोणचा २०२३ मध्ये रिलीज झालेला ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यामध्ये अभिनेत्रीने शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर केली होती. ‘पठाण’ चित्रपट यशराज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’ मालिकेचा एक भाग होता.

हेही वाचा : कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

लवकरच दीपिका दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या प्रोजेक्ट के चित्रपटात भूमिका साकारणार असून यामध्ये तिच्यासह अभिनेता प्रभास आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असतील. तसेच अभिनेत्री पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या फायटर चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

Story img Loader