अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. त्यांच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे हे दोघे नेहमी चर्चेत असतात. चाहतेही या जोडीकडे आदर्श जोडी म्हणून पाहतात. दीपिकाने अलीकडेच ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा : “निसर्गाने लोकांना रेड अलर्ट दिला…”, हिमाचल प्रदेशातील पूरस्थितीवर यामी गौतमने मांडले परखड मत
दीपिका पदुकोणला, “तुम्ही दोघे डेट नाइट प्लॅन कशी करता? तुला विविध रेस्टॉरंटमध्ये जायला आवडते का?” असा प्रश्न विचारण्यात आला यावर अभिनेत्री म्हणाली, “मला रेस्टॉरंटमध्ये जायला अजिबात आवडत नाही, यापेक्षा आम्ही आमच्या घरात एकत्र वेळ घालवतो. अधूनमधून आम्ही डेट नाइटला वगैरे जातो परंतु, नेहमीच असे करत नाही. घरी चित्रपट पाहणे आणि बाहेरून जेवण ऑर्डर करून एकमेकांबरोबर वेळ घालवणे आम्हाला जास्त आवडते.”
हेही वाचा : “तिथे एक बेशुद्ध मुलगी दिसली अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
दीपिका पुढे घरगुती डेट नाइटविषयी सांगताना म्हणाली, “माझा नवरा आणि मी… आम्ही दोघेही कामानिमित्त खूप प्रवास करतो. सतत असंख्य लोकांबरोबर संपर्कात राहावे लागते. त्यामुळे जेव्हा कामाला सुट्ट्या असतात किंवा फारशी कामे नसतात तेव्हा आम्ही घरी राहून चित्रपट पाहतो, बाहेरून जेवण ऑर्डर करतो. असा वेळ घालवणे मला खूप आवडते.”
हेही वाचा : “तू कधीच चांगली आई होणार नाहीस”, आलिया भट्टने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाली, “कुटुंबासाठी मी माझे काम…”
रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये लग्न केले. दीपिका नुकतीच शाहरुख खानसोबत पठाणमध्ये दिसली होती. आता ती किंग खानबरोबर पुन्हा एकदा जवानमध्ये कॅमिओ करणार आहे. यामध्ये तिची खास भूमिका आहे.
हेही वाचा : जेव्हा पत्नीला न सांगता अजय देवगणने दिलेला किसिंग सीन; ‘ही’ होती काजोलची प्रतिक्रिया
दरम्यान, रणवीर सिंह सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला असून २८ जुलैला रिलीज होणार आहे.