शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा व्यवसाय करून सुपरहिट ठरला. या चित्रपटातील पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झाल्यानंतर चांगलाच वाद झाला होता. हा वाद अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीवरून झाला होता. पण, चित्रपटातील कोणत्याच कलाकाराने या वादावर प्रतिक्रिया दिली नव्हती. पहिल्यांदाच दीपिकाने या वादावर मौन सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“जेव्हा मी त्यांच्यासमोर…” नसीरुद्दीन शाहांबरोबर रोमँटिक सीन करण्याबद्दल संध्या मृदुलचं वक्तव्य

‘इंडिया टुडे’ मॅगझिनशी बोलताना दीपिकाने गाण्याच्या वादादरम्यानचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “मी आम्हा दोघांसाठी (ती व शाहरुख) हे सांगू शकते की आम्हाला दुसरा कोणताही मार्ग माहीत नव्हता. मला वाटतं की आम्ही जसे माणूस म्हणून आहोत आणि ज्या पद्धतीने आमच्या कुटुंबांनी आमचं पालनपोषण केलं होतं, तसेच आहोत. आम्ही फक्त स्वप्नं आणि आकांक्षा घेऊन इथं मुंबईत एकटे आलो आहोत. आम्हाला फक्त वचनबद्धता, कठोर परिश्रम आणि नम्रता माहीत आहे आणि यामुळे आम्ही जिथे आहोत तिथे पोहोचलो आहोत.”

Video: अदिती राव हैदरी व सिद्धार्थ लग्न करणार? अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर सेलिब्रिटींच्या कमेंट्स चर्चेत

दीपिका पुढे म्हणाली, “काही प्रतिकूल परिस्थिती हाताळणं अनुभव आणि परिपक्वतेनं जमतं. आम्ही दोघेही अॅथलिट होतो. मला माहीत आहे की तो शाळा-कॉलेजमध्ये खेळायचा. खेळ तुम्हाला संयमाबद्दल खूप काही शिकवतो. जसं मी म्हटलं की दुसरा कोणताही मार्ग मला माहीत नव्हता. मार्ग माहीत नसला की प्रतिक्रियाही नसते. संयम, लवचिकता आणि नम्रता आणि स्वतःबद्दलचं सत्य माहीत असल्याने इतर सर्व आवाज बंद करता येतात.”

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चार वर्षे रुपेरी पडद्यापासून गायब राहिल्यानंतर शाहरुखने ‘पठाण’ चित्रपटातून मेगा कमबॅक केले. हा चित्रपट २५ प्रदर्शित झाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone reveals how she and shah rukh khan dealt with beshram rang pathaan controversy hrc