शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद आणखीनच पेटला आहे. चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने बराच वाद सुरू आहे. सोशल मीडियावरूनही या चित्रपटाला विरोध दर्शवण्यात येत आहे. दीपिकाच्या भगव्या बिकिनीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पण शाहरुखच्या लूकसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
‘बेशरम रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यानंतर दीपिकाच्या लूकची चर्चा रंगली. या गाण्यातील शाहरुखच्या लूकसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. ‘आजतक’च्या वृत्तानुसार शाहरुखने या गाण्यासाठी परिधान केलेला शर्ट ८,१९४.८३ रुपयांचा आहे. काळ्या रंगाचा फ्लोलर प्रिंट असलेला शाहरुखचा शर्ट AllSaints ब्रॅण्डचा आहे.
या गाण्यासाठी शाहरुखने परिधान केलेले शूज आणि त्यांची किंमत तर लाखो रुपये आहे. १,१०,६७७.६० रुपये या शूजची किंमत आहे. शाहरुखने या गाण्यामध्ये घातलेला गॉगलही तितकाच महागडा आहे. Eyevan 7285 Model 163(800) Titanium Frame असलेला शाहरुखच्या गॉगलची किंमत ४१ हजार २१०रुपये इतकी आहे.
एकूणच काय तर दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीची चर्चा सुरु असताना शाहरुखच्या महागड्या लूकनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सुरू असलेल्या वादाचा आता ‘पठाण’ चित्रपटावर कितपत परिणाम होणार? हे पाहावं लागेल.