बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट ३१ मे २०१३ ला प्रदर्शित झाला. यानिमित्ताने या चित्रपटातील कलाकारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. नुकतंच दीपिका पदुकोणने शेअर केलेल्या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे.
‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने या चित्रपटातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यातील एका व्हिडीओला कॅप्शन देताना तिने “माझ्या हृदयाचा तुकडा”, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या व्हिडीओ स्टोरीवर तिने “माझा आत्मा” असे म्हटले आहे. त्याबरोबरच दीपिकाने एक अॅनिमेटेड व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…
करण जोहर निर्मित या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याचे काही फोटोही समोर आले आहेत. यात या चित्रपटातील अनेक कलाकार पाहायला मिळत आहेत. यावेळी दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “मी १० वर्षे शिवसेनेसाठी गाणी केली, नंतर उद्धव ठाकरेंना…”, अवधूत गुप्तेचं स्पष्ट वक्तव्य
दरम्यान ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. करण जोहर निर्मित हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, कल्की कोचलिन आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट त्यांच्या मैत्री आणि नातेसंबंधांवर आधारित होता. या चित्रपटातील गाण्यांना विशेष पसंती मिळाली होती.