बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नेहमीच चर्चेत असतात. ऑनस्क्रीन असो वा ऑफस्क्रीन दोघांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा होताना दिसते. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर बिनधास्तपणे कमेंट्स करताना दिसतात. तसेच सार्वजनिक ठिकाणीही हे दोघे अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. नुकताच दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रणवीर सिंहला टॅग करत एक मीम शेअर करत त्याला ट्रोल केले आहे.

हेही वाचा : “सेटवर अभिनेत्याला मारहाण…” ‘तारक मेहता’मधील ‘बावरी’चा धक्कादायक खुलासा, म्हणाली “तो अतिशय घाणेरडा…”

दीपिकाने शेअर केलेल्या मीममध्ये एक व्यक्ती झाडं खरेदी करत आहे आणि दुसरी व्यक्ती “आपल्याकडे खूप झाडं आहेत” असे म्हणत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा मीम आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत दीपिकाने रणवीर सिंहला टॅग केले आहे. आता यावर रणवीर काय प्रतिक्रिया देणार याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : अभिनेत्री गौहर खानने शेअर केली मुलाची पहिली झलक, बाळाचे नाव आहे खूपच खास

रणवीर-दीपिकाच्या नात्याची सुरुवात ‘गोलियों की रासलीला रामलीला’ चित्रपटादरम्यान झाली होती. २०१८ मध्ये दोघांच्या नात्याचे रुपांतर लग्नात झाले. मध्यतंरी दीपिकाने टाइम मासिकाला मुलाखत देताना पती रणवीर सिंहचे खूप कौतुक केले होते.

हेही वाचा : Video : ‘ही चाल तुरूतुरू’नंतर मिथिला पालकरने आमिर-करीनाच्या ट्रेडिंग गाण्यावर बनवले नवे Cup Song, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, सध्या दीपिका तिच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘फायटर’ या चित्रपटांच्या कामामध्ये व्यग्र आहे. यापूर्वी ‘पठाण’ चित्रपटात दीपिकाने शाहरुख आणि जॉनसह काम केले होते. ‘पठाण’ २०२३ मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. तसेच अभिनेत्री शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ या चित्रपटातही कॅमिओ करताना दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.