बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने बहुचर्चित ‘सिंघम’ सीरिजमधील आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘सिंघम’ मालिकेतील आधीच्या चित्रपटांमध्ये अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार या अभिनेत्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. परंतु, आता पहिल्यांदाच दीपिका पदुकोण ‘लेडी सिंघम’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : Video : हास्यजत्रेच्या नायिका बॉलीवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफरसह थिरकल्या, ‘या’ व्हायरल गाण्यावर केला जबरदस्त डान्स

‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा दीपिका पदुकोणचा पहिला लूक आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीचा रावडी लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये शक्ती शेट्टी ही भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा : Video : अक्षराला घेऊन अधिपती चढणार जेजुरीचा गड, सुरू होणार मास्तरीण बाईंचा संसार, पाहा नवा प्रोमो

दिग्दर्शक रोहित शेट्टीने या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये “नारी ही सीतेचं आणि दुर्गेचं रुप आहे. त्यामुळे आता सिंघम सीरिजमध्ये भेटा आमच्या लेडी सिंघम शक्ती शेट्टीला…” असं म्हटलं आहे. अभिनेत्रीचा हा रावडी लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : प्रार्थना बेहेरे झाली उद्योजिका, नणंदेच्या साथीने सुरू केला नवीन व्यवसाय, ब्रॅन्डचं नाव ठेवलंय खूपच खास

ranveer post
रणवीर सिंह

दीपिका पदुकोणचा पती अभिनेता रणवीर सिंहने बायकोच्या नव्या ‘सिंघम लूक’चं भरभरून कौतुक करत एक खास पोस्ट शेअर केली आहे. रणवीरने तिचा पहिला लूक शेअर करत यावर “आली रे आली दीपिका पदुकोण…आग लगा देगी” असं कॅप्शन दिलं आहे. आलिया भट्ट, रणवीर सिंह, हृतिक रोशन, जॅकलिन फर्नांडिस, नील नीतिन मुकेश, पूजा हेगडे अशा अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी दीपिकावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Story img Loader