बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. भगव्या रंगाची बिकिनी घालून रोमान्स केल्यामुळे दीपिका व शाहरुखानवर टीका केली होती.

‘बेशरम रंग’ गाण्यावर काही दिवसांपूर्वीच शाहरुख खानने त्याची प्रतिक्रिया दिली. आता प्रदर्शनाच्या एक दिवस आधी दीपिकाने या गाण्यावर मौन सोडत तिचं मत व्यक्त केलं आहे. ‘पठाण’ चित्रपटाची निर्मिती केलेल्या ‘यश राज फिल्म्स’ने नुकताच दीपिकाच्या मुलाखतीचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या मुलाखतीत दीपिकाने या चित्रपटातील गाण्याबाबत तिचं मत व्यक्त केलं आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”

हेही वाचा>> अथिया शेट्टीच्या लग्नात सुनील शेट्टीचे डोळे पाणावले; लेक सप्तपदी घेताना भावूक झाला अभिनेता

‘बेशरम रंग’ व ‘झुमे जो पठाण’ या पठाण चित्रपटातील गाण्यांपैकी तुझं आवडतं गाणं कोणतं? असा प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, “दोन्ही गाणी माझी आवडती आहेत. त्यामुळे हे सांगणं फार कठीण आहे. दोन्हीही गाणी वेगळी आहेत. पण ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी मला जास्त मेहनत घ्यावी लागली. हे एक प्रकारचं माझं सोलो सॉँगचं होतं. ज्या ठिकाणी हे गाणं शूट करण्यात आलं, ते फारच कठीण होतं. कारण, तिथे वारा सुटल्यामुळे फार थंडी वाजत होती”.

दीपिका पुढे म्हणाली, “ही दोन्ही गाणी चित्रीत करताना मी आनंद घेतला. मला फार मजा आली. शाहरुख खानबरोबर गाणं चित्रीत करणं मी एन्जॉय केलं. डान्स करताना आम्ही स्टेप्सचा फार टेक्निकली विचार केलेला नाही. आम्ही फक्त स्टेप्स समजून घेतल्या व त्या करताना त्याचा आनंद घेतला. त्यामुळेच दोन्हीही गाणी हिट ठरली”.

Story img Loader