बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण हिचं नाव कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. ओम शांती ओम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी दीपिका ही बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री मानली जाते. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आणि दीपिकाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पठाण’ चित्रपटाने चांगली कमाई केली होती. मात्र या चित्रपटातील दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे वाद निर्माण झाला होता. आता त्यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपिका पदुकोणने फक्त देशात नाही तर संपूर्ण जगात तिने एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. तिचे चाहते संपूर्ण जगभरात आहेत. नुकतंच दीपिका पदुकोण ही ‘टाइम’ या जगातील प्रतिष्ठित मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली आहे. त्यामुळे तिचे नाव जगभरातील दिग्गजांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये संधी कशी मिळाली? शिवाली परबने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “आगरी भाषा…” 

नुकतंच दीपिकाने तिच्या चित्रपटावरुन होणाऱ्या राजकारणाबद्दल भाष्य केले आहे. यात तिने पद्मावत चित्रपटावेळी झालेल्या विरोध ते पठाण चित्रपटातील भगव्या रंगाची बिकिनी परिधान करण्याबद्दल झालेला वाद याबद्दल मत मांडले आहे. “माझ्या चित्रपटांवरुन होणाऱ्या वादांमध्ये अडकण्यापेक्षा मी माझ्या कामात लक्ष देणे पसंत करते”, असे दीपिकाने म्हटले आहे.

‘तुझ्या चित्रपटाबद्दल अनेक राजकारणी मत मांडताना दिसतात, त्याबद्दल तुला काय वाटतं?’ असा प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला. “मला याबद्दल काही वाटलं पाहिजे की नाही, याबद्दल मला खरंच काही माहिती नाही. पण मला यातील कोणत्याच गोष्टींनी महत्त्व द्याव असं वाटत नाही, असे दीपिकाने सांगितले.

आणखी वाचा : “तो भीक मागत होता अन्…” एक्स बॉयफ्रेंडने केलेल्या फसवणुकीबद्दल दीपिका पदुकोण स्पष्टच बोलली

दरम्यान दीपिका पदुकोण ही लवकरच अभिनेता प्रभासबरोबर ‘प्रोजेक्ट-के’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याबरोबरच ती लवकरच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबत ‘फायटर’ चित्रपटात झळकणार आहे. हे दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित होणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone talks about receiving political backlash for padmavat and pathaan orange bikini controversy nrp