२०२४ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाची घोषणा झाली. या चित्रपटातून संजय लीला भन्साळी आलिया भट्टबरोबर पुन्हा काम एकदा काम करणार असून आलिया आणि रणबीर कपूर यांना एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये पुन्हा एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ फ्रँचायजीनंतर हा दुसरा चित्रपट असेल ज्यात हे दोघे एकत्र दिसणार आहेत. इतकेच नाही तर चाहत्यांसाठी अजून एक विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे, ‘छावा’च्या रिलीजसाठी सज्ज असलेला विकी कौशल ‘लव्ह अँड वॉर’मध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट आता २०२६ मध्ये रिलीज होणार आहे.
आता हा सिनेमा आधीच मोठा आणि भव्य असताना, भन्साळी यांच्या तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणारी दीपिका पदुकोण ‘लव्ह अँड वॉर’मध्ये एक खास कॅमिओ करणार आहे, तर? IMDb पेजवरील अपडेटनुसार, दीपिकाचे नाव IMDb च्या यादीत ‘कॅमिओ अपिअरन्स’ म्हणून झळकत आहे, या सिनेमात आलिया, रणबीर, विकी आणि ऑरी यांच्या मुख्य भूमिका आहेत. IMDb पेजवरील हा छोटा पण महत्त्वाचा तपशील पाहून चाहते आधीच खूप उत्सुक झाले आहेत, कारण या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.
जर दीपिका पदुकोण ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा खऱ्या ठरल्या, तर याचा अर्थ ७ वर्षांनंतर ती पुन्हा भन्साळींबरोबर काम करेल. त्यांनी शेवटचे २०१८ मध्ये ‘पद्मावत’साठी एकत्र काम केले होते. इतकेच नाही तर ३ वर्षांनंतर दीपिका आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. २०२२ मध्ये आलेल्या ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन – शिवा’मध्ये दीपिकाचा कॅमिओ होता, पण यापूर्वी रणबीरबरोबर ती शेवटची २०१५ च्या ‘तमाशा’मध्ये दिसली होती.
आलियाबद्दल भट्ट गंगूबाई काठियावाडीच्या (२०२२) प्रमोशनदरम्यान तिने केलेली मजेशीर कमेंट सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे. त्यावेळी अलियाने म्हटले होते, “त्यांनी दीपिकाला ३ चित्रपट दिले, पण मला ४ चित्रपट देण्याचं वचन दिलं. मात्र त्यांनी असं कधीच वचन दिलं नाही की त्या चौथ्या चित्रपटात दीपिकालाही घेतील.”