अभिनेत्री दीपिका पदुकोण ही तिच्या आगामी चित्रपटांमुळे सध्या खूपच चर्चेत आहे. या यादीतील एक चित्रपट म्हणजे ‘पठाण.’ काल शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची पहिली झलक लोकांसमोर आणली. या अॅक्शनपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे तिघे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा टीझर लोकांना खूप आवडला आहे. हा टीझर यूट्यूबवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. दरम्यान, या चित्रपटावर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींच्याही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पण या सागळ्यात आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांच्या केमिस्ट्रीने लक्ष वेधले आहे.
आणखी वाचा : शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त अयान मुखर्जीची किंग खानच्या चाहत्यांना खास भेट, पोस्ट शेअर करत म्हणाला…
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने या चित्रपटाच्या टीझरचे कौतुक केले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा टीझर शेअर करत तो अप्रतिम असल्याचे म्हटले. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाच्या टीझर शेअर करत लिहिले, “हा टीझर नेक्स्ट लेव्हल आहे.’ या स्टोरीमध्ये रणबीरची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पदुकोण हिलाही तिने टॅग केले. आलियाच्या या कमेंटवर आता दीपिका पदुकोणने हटके उत्तर आले आहे. दीपिकाच्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आलिया भट्टने पोस्ट केलेली इन्स्टाग्राम स्टोरी दीपिकाने पहिली आहे त्याला उत्तर दिले. आलियाच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने लिहिले, “थँक्स यू मम्मा!” दीपिकाच्या या उत्तराने चाहतेही आवाक् झाले. यानिमित्ताने दीपिका आलियाच्या बाळासाठी किती उत्सुक आहे हेदेखील दिसले. या दोघींमधील इतकं चांगलं बॉण्डिंग हा सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा : Video : “आता खूप झालं…” अयान मुखर्जीवर वैतागला रणबीर कपूर, व्हिडीओ व्हायरल
‘पठाण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. यापूर्वी सिद्धार्थ यांनी ‘बँग बँग’ आणि ‘वॉर’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. आता ‘पठाण’ हा त्यांचा तिसरा अॅक्शनपट आहे. पुढील वर्षी २५ जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.