ज्येष्ठ पार्श्वगायिका व यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचं २० एप्रिल रोजी गुरुवारी निधन झालं. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूड कलाकार आदित्य चोप्रा व राणी मुखर्जीच्या घरी भेट देऊन त्यांचं सांत्वन करत आहेत. आमिर खान व किरण रावपासून ते दीपिका पदुकोण व रणवीर सिंग हेदेखील आदित्य चोप्राच्या घरी पोहोचले.
आई पामेला चोप्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी निर्माता करण जोहर आदित्य चोप्राच्या घरी पोहोचला. तसेच आमिर खाननेही पामेला चोप्रांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांचा धाकटा मुलगा उदय चोप्राला मिठी मारत त्याचं सांत्वन केलं.
आमिर त्याची पूर्व पत्नी किरण राव व मुलगा जुनैदबरोबर पोहोचला होता.
अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चनदेखील पामेला यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले.
अनू मलिक, जॉन अब्राहम, शबाना आझमी, दिपीका पदुकोण, रणवीर सिंह, श्रद्धा कपूर, कतरिना कैफ व विकी कौशल यांनीदेखील चोप्रा कुटुंबाची भेट घेतली व पामेला चोप्रा यांना श्रद्धांजली वाहिली.
पामेला गेल्या १५ दिवसांपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल होत्या. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं, मात्र त्यांची प्रकृती खालावली व निधन झाला. त्यांच्यावर २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.